पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

हें पहाण्यास क्वेट्टयाला रेल्वेंतून गेलें म्हणजे पुरे. प्रत्येक टेकडीवरील उच्च ठिकाणीं टेहळणीचें नाकें, पूल असल्यास तो बंद करण्यासाठी लोखंडी दरवाजे व त्यांचें संरक्षण करण्यासाठी कांही लष्करी माणसे, तारांचें जाळे, गुप्त पोलिसांचा सुळसुळाट इत्यादि गोष्टींवरूनच आपण एका लष्करी छावणीत शिरलो आहों ही स्पष्ट जाणीव होते. क्वेट्टयास 'नुसतें जाऊन येऊं' म्हणून कोणी गेल्यास त्याला वाटेंतूनच परत फिरण्याची पाळी यावयाची. कारण कोण, कोठला, कशासाठी आला, राजकीय चळवळ्या आहे की कसे, या चौकशींच्या माऱ्यांतून सुटका झाल्यावर प्रवास पुरा होऊ शकतो. गाडीतच गुप्त पोलिस तपास लावतात. आणि 'नको' असतील त्यांस परस्पर परत पाठवितात. दुजदाब ते क्वेट्टा सी.आय.डी.च्या तीन अधिकाऱ्यांनी तीन वेळां पासपोर्ट तपासल्यानंतर खुद्द क्वेट्टयासही सी.आय.डी. इन्स्पेक्टर नांव टिपून घेण्यास आलाच!
 कलात हे जसे एक ब्रिटिशांच्या हातांतील स्वतंत्र बाहुलें आहे, तसेंच पण बोलून चालून संरक्षणाखाली आलेलें दुसरें एक संस्थान आहे. त्याचें नांव लासबेला आणि तेथील अधिपांस जामसाहेब म्हणतात.

 ह्या दोन्ही राजघराण्यांपूर्वी बलुचिस्तानांत हिंदु राजे राज्य करीत. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी कलातचें राज्य हिंदूंकडे होतें! नादिरशहाने हिंदुस्थानवर स्वारी केली त्याच सुमारास हिंदु राजास पदच्युत करून एका पठाणी धनगराने राज्य बळकावलें तें त्याच्याच वंशांत चालत आहे. बलुचिस्तानांतील मुख्य भाषा 'ब्रहुई' ही दक्षिणेकडील तामीलशीं फार जमते. आणि ती द्रावीड भाषांपैकी आहे असेंच तज्ज्ञ म्हणत आहेत. सिंधी, पंजाबी, फार्सी व पुश्तु भाषा 'हिंदी-इराणी' (इंडो-इराणियन) वर्गातल्या असतां मध्यंतरीच हें द्रावीड भाषेचें

१६४