झालं? मी सांभाळेन हिला, तीन मुलांसकट. भावाने घरी ठेवली हिला. असं कुणी ठेवत नाही. नंतर कोर्टाचा डिसीजन लागला. त्या माणसाच्या डोंगरावर दोन खोल्या होत्या, त्याच्या मालकीच्या. पण हिच्या ताब्यात होत्या. मी म्हटलं तू ही जागा सोडायची नाहीस. त्याला दोन खोल्या आहेत नं, तुझ्या नावाची एक करून दे म्हणून सांग पण जाऊ नको तिथं राहायला. का तर आजूबाजूची वस्ती फार खराब, वाईट होती. सगळे भ्यायचे का तिथं मारून फेकलं तरी कळणार नाही कोणाला म्हणून. गुंडांची वस्ती असं लोक म्हणायचे. आम्ही कोर्टात ती केस जिंकली. पोटगीचा तर प्रश्न नाही आणि तो देणार पण नाही. पोटगी जरी कोर्टानं मंजूर केली तरी नवरे देतातच असं नाही. दर महिन्याला झिकझिक किंवा चार महिने झाले का पुन्हा कोर्ट. त्याला काही अर्थ नाही. पण एवढं मात्र खरं की प्रोटेक्शन बाईला आज नाहीये कायद्याचं, ते मिळालं पाहिजे. म्हणजे तिला जेव्हा जावंसं वाटतं कोर्टात तेव्हा जाता आलं पाहिजे. तिला सेफ्टी तेवढी एकच आहे नं? तिला असं वाटत असेल की, नाही दिली तर नाही दिली पोटगी, पण मला पोटगीचा अधिकार तर आहे ना? मी कोर्टात जाऊ शकते ना? मी सुरुवातीला तिच्या बरोबर कोर्टात जायची. सुनावणी ऐकायची. म्हणजे माझा असा किती तरी वेळ जायचा आणि ती माझ्याकडेच यायची. त्यामुळे मला खूप सिंपथी वाटायला लागली. हे सगळं झालं. त्या खोलीला टाळा ठोकून ऑफिशिअली तिला त्या घराचा ताबा मिळाला. ते घर अजूनपर्यंत होतं. आत्ता तिनं ते २५,०००/- रुपयांना विकलं. मोडकं तोडकंच होतं, म्हणजे पत्र्याचं. तिनं मुलांच्यासाठी ठेवलं होतं. तीन मुलं सांभाळणार कशी ती बाई? पण पाचवी - सहावी पर्यंत एक मुलगा शिकला. एक सातवीपर्यंत शिकला. एका मुलाला आम्ही वसतिगृहात ठेवलं होतं कोल्हापूरला. हुसेन जमादारांनी तिथं ठेवलेलं होतं. थोडेसे पैसे दरमहा द्यायचे. तो मुलगा तिथून एस.एस.सी. होऊन निघाला. दुसरा मुलगा होता. माझ्या दोन्ही मुली लोणावळ्याच्या गुरुकुलमध्ये शिकलेल्या. आमची धाकटी एस.एस.सी. होऊन निघाली तेव्हा मी चंदावरकरांना सांगितलं का हा माझा मुलगा समजून तुम्ही ठेवून घ्या. त्याला फी माफ करा. नॉमिनल देईन मी पाहिजे तर. त्यांनी त्याला ठेवलं. तोही एस.एस.सी. होऊन निघाला. तो मला म्हणाला, का मला कॉलेज शिकायचं. म्हणून दोन्ही मुलांना मी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला घातलं. पैसे भरून घातलं. पण दोघेही पुढे जाऊ शकले नाहीत. मग माझ्या लक्षात आलं, उगाच पैसे घालवले आणि ग्रॅज्युएट होऊन तरी काय लगेच नोकरी मिळणार आहे का? मग त्यांना
मी भरून पावले आहे : १९३