सिग्नेचर कशी करायची हे दाखवली. का तर बँकेचा अकाउंट मी उघडला होता. ती आमच्याकडे यायच्या आधी कोर्टात गेली होती. आणि त्या नवऱ्याला तंबी पण मिळाली होती बायकोला सोडल्याबद्दल. तर त्यानं काय केलं? दुसरी बायको केली. तिला पण चार मुलं. तो करोना शू कंपनीत कामाला होता. पगार चांगला मिळायचा. त्या बाईला तो पोसायचा म्हणजे ती गावालाच मुलं घेऊन असायची. आणि हा इकडं असायचा. तोही चांगला देखणा होता. सासूचं घर-बिर मोठं होतं. २-४ रूम्स अशा भाड्यानं दिलेल्या होत्या. पैशाची कमी नव्हती. पण हिला त्रास द्यायचा तो आणि हिला ठेवायलाच तयार नव्हता. तेव्हा ही एकटी वेगळी काय करणार? तिला तेव्हा कामधंदा पण काही नव्हता. नंतर ती बाटल्या धुण्याच्या कामाला टेंपररी लागली. नंतर आमच्याकडे आली. राजू अली मुल्लानी नावाचा एक जण होता. त्यानं तिला आमच्याकडे आणली. आम्ही सगळ्या केसचा अभ्यास केला. ती पहिली केस आमच्याकडे आलेली होती. लैला भित्री होती, इतकी की बाहेर निघायचं पण माहिती नव्हतं. बोलायचं माहिती नव्हतं. माझ्याकडे आल्यानंतर मी शिकवायला लागले सगळं तिला. तर ती थोडीशी हुशार झाली. कोर्टामध्ये केस दाखल केली. कोर्टामध्ये नवरा यायचाच नाही. मी तिला काय म्हणायची की, पोलिसाला घेऊन जा आणि हात धरून आण त्याला. तिथंच जवळपास राहात होती ना, म्हणून ती पोलिसांना घेऊन जाऊन त्याची कॉलर धरून आणायची. म्हणजे नंतर ती इतकी बोल्ड झाली होती. मग पोटगीची केस झाली. तिला पोटगी द्यायला नको म्हणून त्या माणसानं नोकरीचा राजीनामा दिला! तो म्हणाला की, मी नोकरीच करत नाही. माझ्याकडे पैसाच नाही. तर मी हिला पोटगी देणार कुठून? असं करून त्यानं नोकरी सोडली. दोन हजार रुपये पगार कमवत होता त्या काळामध्ये. १५-१७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तिला खूप त्रास दिला. लहान लहान मुलं तिची शाळेत जाणारी. मग आमच्याकडे आल्यानंतर मी म्हटलं, आता आपण इथपासून काम सुरू करायला पाहिजे. ही एक बाई आपल्याकडे आली. हिला आपण कशी पुढे नेणार? ह्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल ना बायकांची. तिची मुलं शाळेत जायला लागली म्युनिसिपालिटीच्याच. त्यांना कपडे, पुस्तकं वगैरे दिली. झोपडी तिथंच होती. शाळेच्या जवळच. घर-बिर काही मोठं नव्हतं. भावाची झोपडी होती. तो शिवणकाम करायचा. गरिबी होती पण भाऊ फार चांगला होता. लहान होता हिच्यापेक्षा. आई पण चांगली होती. भाऊ म्हणाला जाऊ दे, सोडलं तर काय
पान:मी भरून पावले आहे.pdf/207
Appearance