पान:मी भरून पावले आहे.pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्टेशनवर यावं लागेल.' तर म्हटलं, 'काय काम आहे?' 'सांगता येणार नाही', म्हणाले. 'ठीक आहे.' तर मी महंमददांना सांगितलं, असं असं आहे. तर ते म्हणाले, 'आपण जायचं.' मला त्या वेळी वाटलं की पोलिसवाले कशाला बोलावतात? त्या वेळी मी नगरकरांना आणि पोलीस कमिशनर कसबेकर यांना फोन केला. 'कोल-डोंगरी पोलीस चौकीतून मला बोलावलं आहे. मी काय करू?' तर ते म्हणाले, 'बोलावलं आहे तर जायचं. भिण्यासारखं काय आहे? कशाला बोलावलं आहे ते तुम्ही जाऊन बघा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही एकटं जायचं नाही. तुमच्या मंडळाची काही माणसं तुम्ही बरोबर घेऊन जायची. नि दुसरं, तिथं भ्यायचं नाही. हळू बोलायचं नाही. जोरात बोलायचं, जे काय बोलायचं ते.' या दोन हिंट घेतल्या नि महंमददांना घेऊन मी पोलीस-चौकीत गेले. गेल्यानंतर, तिथे मुसलमान पोलीस ऑफिसर होते, हे नंतर कळलं. आधी माझा काही संबंध आला नव्हता. तिथं गेल्यानंतर टेबलावरचे पेपर्स बघितल्याबरोबर मी म्हटलं, 'महंमददा, मी त्या दिवशी एकटीच गेले होते ना त्या प्रोग्रॅमला, तिथलं काही तरी लफडं लागलेलं आहे मागे.' माझ्या काही लक्षात येईना. ते म्हणाले, 'नाही हो. काकी, काही तरीच काय.' म्हटलं, 'शक्यच नाही. आता माझ्या लक्षात आलं.' नंतर ते ऑफिसर मला म्हणाले, 'काय बाई, तुम्ही कुठल्या प्रोग्रॅमला गेला होतात?' तर म्हटलं, 'हो, अशा अशा प्रोग्रॅमला मी गेले होते.' 'तिथं काय सांगितलंत?' म्हटलं, 'जे सांगायला पाहिजे होतं तेच सांगितलं. काय झालं?' तर 'नाही, ते तुमच्याकडे लिहिलेलं आहे का?' मी म्हटलं, 'का माझ्याकडे असं पूर्ण भाषण नाही. पण असे मुद्दे लिहिलेले आहेत.' 'तुम्ही आणलेत का?' म्हटलं, 'तुम्ही आणा असं नाही सांगितलंत आणि माझ्या लक्षात आलं असतं तर घेऊन आले असते.' ते म्हणाले, 'आत्ता जाऊन आणता का?' तर 'नाही' म्हटलं. 'आता मी जाणार नाही. तुम्ही आत्ता माझी अपॉइंटमेंट घ्या. आपण ठरवू या, मी ते घेऊन येऊन तुम्हांला दाखवते' आणि दोन दिवसांनंतर जायचं असं ठरवून मी महंमददांना घेऊन आले. मी तो पेपर काढला. 'काय लिहिलेलं आहे?' महंमदानी विचारलं. तर म्हटलं, 'काही नाही, हे असे असे मुद्दे आहेत. आणि हेच मी सांगितलेले आहेत. पुस्तकातलेच आहेत.' आणि मी पुस्तक काढलं, त्याला फ्लॅग लावला नि म्हटलं चला आता चार लोक. आम्ही गेलो त्या दिवशी. गेल्यानंतर अर्धा-पाऊण तास त्या ऑफिसरचा पत्ताच नाही. तो बाहेर पान खात, सिगरेट पित उभा होता. असं टाळलं त्याने. त्यानंतर बराच वेळाने तो आला. आल्यानंतर

मी भरून पावले आहे : १७५