तिला बाजूला राहू दे. मी म्हटलं, “मी काही इतकी वीक माइंडेड नाहीये, त्यामुळे तुम्ही मला बाजूला वगैरे काढायचा प्रश्नच ठेवू नका आणि तुम्ही बायोप्सी करा." मग काय झालं? बायोप्सीसाठी डॉक्टर आले. मी ते बघितलं. असं त्यांना पालथं झोपवलेलं. ज्या बाजूला आपली किडनी असते तिथं मार्क केलं त्यांनी पेन्सिलने. आणि कुठल्या भागाची किडनी खराब झाली असेल त्याचा अंदाज घेतला त्यांनी. मग सुई आतपर्यंत घातली आणि किडनीतला तुकडा ओढून घेतला. खूप त्रास झाला. बोंबाबोंब. कारण त्या वेळी अॅनेस्थेशिया देत नाहीत. आणि एवढं करून तो भाग बरोबर निघाला नाही तर दोन-तीन ठिकाणी परत तेच करावं लागलं. दलवाई खूपच हैराण झाले. आणि मग तो तुकडा काढला. त्यात कळलं की किडनी खराब. मग एक्स-रे काढले. दोन्ही किडन्यांची खात्री झाली तेव्हा मग ते डायलिसिस वगैरे. पहिल्या डायलिसिसच्या वेळी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा दलवाई असे घाबरट नव्हते. मला भीती वाटायची डॉक्टरांची, इंजेक्शनची, ऑपरेशनची. का तर मला कधी सवय नव्हती ना! त्यामुळे मला तशी भीती वाटायची. हे लाइटली घ्यायचे. “हे केलं तर त्यात काय झालं? ते केलं तर त्यात काय झालं." असं बोलत बसलेले असायचे. मी तिथं बघितलं. डायलिसिसच्या सुया टोचतानासुद्धा लोकं बोंबा मारायची. एका ठिकाणातून काढा, दुसऱ्या ठिकाणी घाला. दुसऱ्या ठिकाणातनं काढा तिसऱ्या ठिकाणी घाला. इथं फ्लो बरोबर येत नाही, तिथं घाला. तिथं फ्लो आहे इथं घाला, असं डॉक्टर करायचे. आता इतकी बोंबाबोंब व्हायची त्या पेशंटची. पण ह्यांना काहीही वाटायचं नाही. त्यामुळं तो डायलिसिसचा त्रास तसा त्यांनी वाटून घेतला नाही. त्यांना डायलिसिस आवडायचं नाही. त्यांना असं वाटायचं की, मी झोपून राहातो, काहीही काम करू शकत नाही. त्या काळामध्ये ऑपरेशनला कोणी तयार व्हायचं नाही. डॉक्टर काय म्हणायचे, ५०% रिजेक्शन आहे. ऑपरेशनचा पेशंट जगेल याची गॅरंटी नसली तरी ऑपरेशन हे एकच सोल्यूशन आहे याला. तुम्ही इतक्या त्रासदायक ट्रीटमेंटमधून जाण्यापेक्षा एकदाच मुक्त झालात तर ते बरं, असा डॉक्टर सल्ला द्यायचे आणि यांना ते पटायचं. ते काय म्हणाले, “मला ऑपरेशन चालेल. मी मरेन किंवा जगेन. पण मला ही रोजची कटकट नको. दहा-दहा तास मला हे डायलिसिस नकोय.” त्या काळामध्ये टी.ए. पै म्हणून जे रेल्वे मिनिस्टर होते त्यांचा एक चुलतभाऊ यांच्या बाजूच्या कॉटवर आला होता. तो सात-आठ वर्ष डायलिसिस करत होता. यांच्याच वयाचा होता. पंचेचाळीस-सेहेचाळीस वर्षांचा. सगळं अंग झिजलेलं होतं त्याचं. अॅनिमिक
मी भरून पावले आहे : १०९