आता संध्याकाळी त्यांना नेणार, तर त्यांचं एक पुस्तक त्या वेळी प्रसिद्ध झालेलं होतं, जाण्याआधी ते पुस्तक त्यांनी तिथं वाटलं काही लोकांना. मला ते जरा उशीरा कळलं. नंतर मी ह्यांना म्हटलं, "अहो, जेपींचं पुस्तक निघालं आणि सर्वांना ते वाटताहेत. मी पण जाते." ते म्हणाले, 'तुला काय कळतंय.' मी म्हटलं, "तुम्ही वाचा की, मला काय करायचंय? आपल्याला पण मिळायला पाहिजे की." आणि पुस्तकं संपली नि मी पोचले. बरं, रोज वेगळी माणसं बाहेर बसायची. मला कोणी आत जाऊ देई ना रूममध्ये त्यांच्या.मी म्हणाले, "मुझे जेपीजीके रूम में जाने दो जरा। मैं नीचे से आई हूँ। जेपी को बोलो जरा मै आई हूँ। मुझे भी किताब चाहिए।" कोणी आत जाऊ देईना मला. शेवटी मी ओरडायला सुरुवात केली. स्टंट केला. आणि जेपींनी ते आतून ऐकलं. ते म्हणाले, 'किसकी आवाज आ रही है? कोई महिला की आवाज आ रही है। उसको मत रोको, उसको अंदर आने दो।' आणि असं करून मी आत आले. तर बोलले,'क्या हुआ?" मी बोलले, "देखो ना, ये लोग मुझे अंदर आने नही दे रहे है। रोक रहे है वहाँ पे। सबको इन्होंने किताबे दी। मैने माँगी तो नही है बोलते। खतम हो गई है। जेपीजी, तो आप मुझे किताब दो। मै लिये बिना नही जाऊंगी।" मग त्यांनी माझ्याकडे बघितलं, हसले, नि एका माणसाला सांगितलं,'नही नही ऐसा मत करो। तुम ऐसा करो - अभी मै डिस्चार्ज होके घर पे जाता हूँ। कल इनके हाथसे तुम्हारे लिए किताब भेजूंगा। वो तुमको तुम्हारे रूम मे ला के देगा।" आणि त्या माणसाला म्हणाले, 'ला के देना इनको जरूर." 'थँक्यू', बोलले मी आणि आले आणि ह्यांना सांगितलं. हे म्हणाले,'कशाला तू असं करायला गेली होतीस?' मी म्हटलं की,"सगळ्या लोकांनी नेलं.मला ते पुस्तक नको होतं काय? मी वाचते किंवा वाचत नाही हा प्रश्न वेगळा आहे." दुसऱ्या दिवशी आणून दिलं त्यांनी ते पुस्तक.
डायलिसिस करायच्या अगोदर बायोप्सी म्हणून करायची असते आणि बघायचं असतं की, किडनीचा कुठला भाग किती खराब झालाय. किडनी खराब खरंच झालेली आहे, का आपल्यालाच तसं वाटतंय, हे बायोप्सीनं कळायचं. तर बायोप्सी काय आहे, आम्हांला काही माहिती नव्हतं. एक दिवशी म्हणाले की चला, आपल्याला बायोप्सी करायचीये. हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या महिनाभर काय तर त्यांच्या टेस्टच झाल्या. गेल्या गेल्या डायलिसिस वगैरे काहीच होत नाही. चेकिंगच चाललं महिनाभर, बायोप्सी करायची तर रूममध्येच करायची. ह्यांनी सांगितलं, का काही झालं तरी तुम्ही मेहरूला बाहेर काढायचं नाही. तिला रूममध्येच राहू दे.
पान:मी भरून पावले आहे.pdf/123
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.