ते पांच वाजेपर्यंत उघड्या असतात. नोकऱ्यांची वेळ पाहूं गेल्यास कित्येकांनां सकाळी पहांटे, तर कित्येकांनां रात्रीं आणि कित्येकांनां संध्याकाळी तर कित्येकांनां मधल्या वेळीं, याप्रमागें असते. शहरची रहाणी एका तऱ्हेची तर खेडेगांवची दुसऱ्या तऱ्हेची. या व दुसऱ्या हरएक कारणांमुळे सर्वांनां एकच नियम घालून देतां येणें शक्य नाहीं. परिस्थित्यनुरूप त्यांचा नित्यवर्तनक्रम निरनिराळा असावा लागतो. असें जरी आहे तरी बहुतेकांची वेळ साडेदहा ते पांचपर्यंत असल्यानें त्याला अनुसरून खाली दिल्याप्रमाणें नित्यवर्तनक्रम ठरविण्याला सोयी- बार होईल.
प्रत्येकानें सकाळीं पांच वाजतां उठावें. थोडा वेळ ईश्वरस्मरण
करून मग शौचमुखमार्जन करावें, आणि आदल्या रात्रीं निजतांना
आंखून ठेविलेला कार्यक्रम पार पाडण्याचा निश्चय करावा. नंतर नुसतें
पाणी किंवा पेलाभर दूध पिऊन सहा वाजतां गांवाबाहेर मोकळ्या
हवेंत फिरावयास जावें. तेथें गेल्यावर शक्त्यनुरूप धांवणें, दंड काढणें,
बैठका मारणे वगैरे व्यायाम करावा. अगर गावांत हवाशीर जागी एकादी
व्यायामशाला असल्यास तेथें जाऊन व्यायाम करावा. याप्रमाणे तासभर
मेहनत करून सात वाजतां घरीं यावें व आठ वाजेपर्यंत बाजारांत
जाणें, हजामत करिवणें, जरूर असल्यास औषध आणणे वगैरेकडे लक्ष्य
देणें. तसा उद्योग नसल्यास मुलांच्या अभ्यासाकडे, शरीरप्रकृतीकडे,
कपड्यालत्त्यांच्या आणि घराच्या स्वच्छतेकडे अगर वाचनांत वेळ घाल-
वावा. अशीं कामें होतांहोईतों एकावरच न सोपवितां घरांतील इतर
माणसांनां वांटून द्यावींत. आठपासून नऊपर्यंत अभ्यंग, स्नानसंध्या,
ईश्वरस्मरण करावें व नऊ वाजतां जेवावयास बसावें. विद्यार्थ्यांनीं
पहांटे चार वाजतां उठून शौचमुखमार्जन करावें व सात वाजेपर्यंत अभ्यास