पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

७५

 बलिष्ठांशीं कज्जा करूं नये व नीच लोकांची सेवाचाकरी करूं नये. शत्रूच्या घरचें किंवा त्यांनी दिलेले अन्न, यज्ञसत्र, वेश्या व दुकान- दार यांच्या घरचें अन्न (मेवामिठाई ) बगैरे खाऊं नये.

 हात व डोकें उगाच हालवूं नये.

 आद्यापेक्षां खर्च कमी करावा. कर्ज करूं नये.

 पूज्य लोक बसलेले असतां त्यांच्यामधून जाऊं नये.

 लोकसमुदाय हा मोठा गुरु आहे, त्याअर्थी शहाण्यानें त्यांच्याप्रमाणें लौकिक गोष्टींमध्यें विचारपूर्वक वागावें.

 सर्व प्राण्यांवर दया करावी.

  कायिक, वाचिक व मानसिक क्रियांवर दाब ठेवावा.

 लोकांच्या कामामध्ये स्वतःप्रमाणे कळकळ ठेवणें हें श्रेष्ट व्रत होय.

 सत्संग व सभ्यपणा हे पुण्यमंदिराचे खांब होत.

 मी काय करितों, कोटें आहें, माझें वय काय, माझें मन कशांत गुंतलें आहे, हे क्षणोक्षणीं ध्यानांत आणावें (ह्मणजे देश, काल, वय, क्रिया यांसंबंधानें माझी स्थिति कशी आहे याचें वरचेवर स्मरण करावें) ह्मणजे दुःख होणार नाहीं.

 वर सांगितल्याप्रमाणें जो आपली वर्तणूक ठेवितो तो दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, यश यांप्रत पावतो.

१५ - नित्यवर्तनक्रम.

 सांप्रतकाली मनुष्याचा आयुःक्रम अजिबात बदलला आहे, त्यामुळे आपल्या लोकांचा नित्यवर्तनक्रम कसा असावा, हे ठरविणे फार कठीण आहे. कारण, लहानपणी शाळेत जात असतांनाचा आयुःक्रम एक प्रका- असतो तर शिक्षणक्रम पुरा झाल्यावर दुसऱ्या प्रकारचा होतो. शाळादेखील कांहीं ठिकाणी सकाळसंध्याकाळ तर कांहीं ठिकाणी दहा