पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

७७

करावा. नंतर वर सांगितल्याप्रमाणे मोकळ्या हवेंत जाऊन व्यायाम करावा व आठ वाजतां घरीं यावे आणि वरच्याप्रमाणे स्नानसंध्या उरकून नवांला जेवावयाला बसावें. जेवणाला अर्धा तास असावा, व तें जेवण साधें, लवकर पचणारें असें असावें; जड असूं नये. याचे कारण दिवसभर • मानसिक श्रम करावयाचे असतात, हे होय. शारीरिक श्रम करणारांनीं याहून किंचित् जड अन्न जेवण्यास हरकत नाहीं. साडेनवांपासून दहांपर्यंत विश्रांति घेऊन नंतर नोकरीवर किंवा शाळेत जावयास निघावें. अशानें धांवाघांव करावी लागणार नाही. सकाळी बायकांनां जो वेळ सांपडतो त्या वेळांत त्यांनां साधें अन्न शिजविण्यास ठीक पडतें. असो. जातांना मधल्या वेळी उपाहारासाठीं दूध, साबुदाण्यांची अगर गव्हांच्या रव्याची लापशी, गव्हांचें, नाचण्यांचें अगर जवांचें सत्त्व, यांपैकी एखादें घरून न्यावें. उपाहारगृहांत कधींहि खाऊं नये. सायंकाळी सुटल्यावर घरीं येऊन, थोडा वेळ विश्रांति ध्यावी व • स्वच्छ स्नान करावें. स्नान करितां येणे शक्य नसल्यास निदान ओल्या पंच्यानें किंचा टॉवेलनें सर्वांग स्वच्छ पुसावें. असेंच विद्यार्थ्यांनीं घरी आल्यावर करून थोडें दूध पिऊन मग मोकळ्या हवेंत व्यायाम करावा. नंतर थोडा वेळ ईश्वरचिंतन करून स्वस्थपणें जेवावें. या जेवणांत सकाळच्याहून थोडे अधिक पदार्थ असावेत. या वेळीं स्वस्थता व वेळ असतो, नोकरीची व शाळेत जाण्याची काळजी नसते, त्यामुळे पचण्यालाहि कठीण पडत नाहीं. बायकांनांहि हें जेवण उत्तम रीतीनें तयार करून ठेविण्यास पुष्कळ वेळ मिळतो. रात्रीं ७ वाजेपर्यंत जेवण उरकून मग तीन तासपर्यंत मित्रांच्या भेटी, संभाषण, हवाशीर जागेत जाऊन बसणें, वगैरे करमणुकीच्या गोष्टी कराव्या, व दहा वाजतां निजावें. निजतांना दिवसांतील कार्यक्रमाचा हिशेब करावा व दुसऱ्या