Jump to content

पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
मी निरोगी कसा राहीन ?

रात्री किंवा कठीण प्रसंगी बाहेर जाणें झाल्यास हातांत काठी असावी व डोकीस रुमाल वगैरे आच्छादन असून बरोबर एकादा सोबती असावा.

 घाण असलेल्या जागेतून जाऊं नये. तसेंच अग्नीच्या ज्वाळांकडे जाऊं नये.

 आपल्या शक्तीबाहेर कोणतेंहि काम करूं नये.

 खोडकर जनावरांवर बसूं नये.

 हसतांनां, शिंकतांनां व जांभई देतांनां तोंडापुढे हात धरल्या- शिवाय राहू नये. चारचौघांत अपान वायु सोडूं नये व नाक कोरीत वसूं नये.

 अंग वेडेवांकडे करूं नये. फार वेळ उकीडवें बसूं नये. कायिक, • वाचिक व मानसिक क्रिया श्रम होण्यापूर्वीच बंद कराव्यात.

 रात्री झाडाखाली निजूं नये.

 वधस्थान, निर्जन अरण्य, ओसाड घर, स्मशान वगैरे ठिकाणीं जाऊं नये.

 सूर्याकडे कधीं पाहूं नये. तसेंच दैदिप्यमान, अपवित्र, अप्रिय व सूक्ष्म पदार्थांकडेहि पाहूं नये.

 डोक्यावर फार वेळ ओझें ठेऊं नये.

 दारु पिऊं नये व तिला शिवूंहि नये.

 प्रखर उन्ह, धूळ, तीव्रवायु व पाऊस यांचें सेवन करूं नये. शरीर अस्ताव्यस्त असतां शिंका किंवा ढेकर देणें, खोकणें, झोंप घेणें या गोष्टी करूं नयेत.

 नदीच्या उगरीजवळ व डोंगराच्या कड्याशी बसूं नये.

 राजशत्रु, दुष्ट, विपारी व शृंगयुक्त जनावरें यांपासून दूर रहावें.