पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

७१

महत्त्वाचें काम नसतांहि वसतात. त्यांनां रविवार असो, बँक हॉलिडे असो, जेवण मिळो न मिळो, तसेंच बांब पळ करून ऑफिसांत जातात. अशा रीतीनें वरिष्ठांचा हुकूम नसतांहि केवळ ऑफिसच्या मुख्याधिकान्याकडे आपले वजन वाढावें ह्मणून केलेल्या या उद्योगा- पासून त्याला स्वतःला व त्याच्या हाताखालील माणसांनां त्रास होऊन कांहीं दिवसांनीं वरिष्ठालाहि हें ढोंग समजतें. शिवाय, आरोग्याचें मातेरें होतें तें निराळे. भगवंतांनी झटले आहे:

 युक्ताहारविहारस्य । युक्तचेष्टस्य कर्मसु ॥

 युक्तस्वप्नावबोधस्य | योगो भवति दुःखहा ॥ १ ॥

 भावार्थ: आहारविहार, उद्योग, निद्रा, जागृति हीं जो माफक ठेवितो, त्याला दुःखाचा नाश करणारा असा योग साधतो. अर्थात्, असला मनुष्य सुखी असतो.

 वरील विवेचनावरून व मागें (पान ११ ) सांगितल्याप्रमाणे मितपणा आरोग्य रहाण्याला किती आवश्यक आहे हें कोणालाही सहज कळण्यासारखे आहे. सारावली नामक ज्योतिपग्रंथांत झटले आहे:-

 पथ्याशिनां शीलवतां नराणां ।

 सद्वृत्तभाजां विजितेंद्रियाणाम् ।

 एवंविधानामिदमायुरेव ।

 सत्यं भवेत् वृद्धमुनिप्रणीतम् ॥ १ ॥

 भावार्थः – येथें ग्रहमानानें ठरलेले आयुष्य जे कोणी शीलवान्, सद्वर्तनी, पथ्यभोजी व जितेंद्रिय असतील, अशांनां मात्र भोगेल. इतरांस नाहीं.

 तात्पर्य, नियमित आयुष्य देखील मितपणा न राखल्यानें व दुरा- चरणानें तुटतें हें स्पष्ट आहे.