पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?
७०

वर्णन आमच्या 'अग्निमांद्य' पुस्तकांत केले असल्यानें दारूसंबंधानें येथें इतकेंच सांगणे पुरे आहे, कीं, जन्ममरणाच्या नोंदी पाहिल्या तर नेमस्त मद्यप्यांपेक्षांहि साधे लोक अधिक जगतात. मद्यानें केवळ शरीराचाच खराबा होतो असे नसून मनाचीहि तीच स्थिति होते. ह्मणून आपला हा अमूल्य देह बरावाईट राखणे प्रत्येकाच्या हातीं आहे. भवभूती ह्मणतात:-

 नैसर्गिकी सुरभिणः कुसुमस्य सिद्धा ॥

 मूर्ध्नि स्थितिर्न चरणैरवताडनानि ॥ १ ॥

- उत्तररामचरितम्.

 भावार्थः – कोमल व सुगंधी पुष्प ह्मणजे मस्तकींच ठेवावयाचें, तें पायांनी तुडविणें मूर्खत्व आहे. या शरीराचें दीव्य मंदिर बनविणे किंवा कचऱ्याची पेटी वनविणे, हे आपल्या स्वाधीन आहे.

 अभ्यास किंवा मानसिकश्रम ज्यांनी घडतात असा कोणताहि उद्योग करणें तोहि बेताबातानेंच केला पाहिजे. मानसिक श्रमांनी येणारा थकवा घालविण्यासाठीं विश्रांति ही घेतलीच पाहिजे. त्यांत हयगय झाल्यास दुखणें हें यात्रयाचेंच. कांही विद्यार्थी सारा दिवस अभ्यास करून रात्रींहि करितां यात्रा ह्मणून नैसर्गिकरीत्या येणारी झोंप घालविण्या- साठीं चहा-कॉफीचें पान करितात. अशा रीतीनें झोंपेचा मोड करून अभ्यास करणे कधींहि हानिकारक झाल्याशिवाय रहात नाहीं. ऑफिसमध्यें नोकऱ्या करणारांचीहि तीच गोष्ट आहे. मुंबईसारख्या शहरांत कांही ठिकाणी तर असे पहाण्यांत येतें, कीं, कांहीं लोक वरि- टांची मर्जी संपादन करण्याकरितां नोकरीची वेळ साडे दहाची असली तर त्यापूर्वी तास अर्धातास ऑफिसांत जाऊन बसतात आणि सायं- काळी ऑफिस सुटण्याची वेळ झाली तरी दोनदोन तीनतीन तास