पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

६९

 समजा, आपण हवें यापेक्षा जास्त अन्न खाऊं लागलों, तर व्यापासून शरीरावर दोन प्रकारचे वाईट परिणाम घडूं शकतात. एक, फाजील अन्न पचलें न जातां अन्नमार्गात कुजून त्यापासून उत्पन्न झालेलीं विषारी द्रव्यें आणि वायु रक्तांत शोषिले जाऊन रक्त खराब होतें व त्या माणसाला अपचन, मलावरोध, मस्तकशूल,अरुचि, अति- सार, संग्रहणी, अग्निमांद्य वगैरेसारखे रोग जडतात. दुसरा, किये - कांची पचनशक्ति चागली असल्याने जास्त खाल्लुले अन्न पचून शरीरपोषणास लागणारीं तत्त्वें फाजील प्रमाणानें उत्पन्न होतात व रक्ताची नैसर्गिक स्थिति बदलून त्यापासून आमवात, मधुमेह वगैरे- सारखे रोग जडतात. तात्पर्य, वाजवीपेक्षा जास्त खाणे किंवा पहिल्या खाल्लेले अन्न न पचतां त्यावर आणखी खात जाणें हें रोगोत्पत्तीला कारण होतें. आर्यवैद्यककार ह्मणतात:-

 अनात्मवन्तः पशुवजन्ते येऽप्रमाणतः ॥

 रोगानीकस्य ते मूलमजीर्ण प्राप्नुवन्ति हि ॥ १॥

 या श्लोकांत अजीर्णाला रोगचमूचें मूळ झटले आहे, हे प्रत्येकानें लक्ष्यांत ठेवावें.

 शरीराला पाहिजे त्यापेक्षां कमी अन्न खाणें हेंहि वाईट आहे. अन्न नेहमीं मितप्रमाणानेंच खाल्ले पाहिजे. वाग्भटकार ह्मणतातः-

हितभुक् मितभुक् सोऽरुक् ।

 भावार्थ: — जो हितकर व मोजकें खातो, पितो तो निरोगी रहातो.

 जीवनाला अत्यंत आवश्यक असें जें पाणी तें देखील वाजवीपेक्षां फाजील पिण्यांत आल्यास जर रोगकर होतें, तर चहा, कॉफी, दारू- सारखीं उत्तेजक व मादक पेयें शरीराची किती हानि करितात, निराळे सांगावयास नको. या उत्तेजक व मादक पेयांसंबधाचें साग्र