पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
मी निरोगी कसा राहीन ?

च वाऱ्याबरोबर उडून श्वासावाटे फुप्फुसांत जातात व त्यामुळे रोगाला कारण म्हणून घर नेहमीं केरकचरा काढून साफसुफ केलें पाहिजे. कचरा कोनाड्यांत न टाकतां त्यासाठी एकादी टोपली ठेवावी च तिच्यांतील कचरा रोजच्यारोज वर सांगितल्याप्रमाणें म्युनिसि- पालिटीच्या पेटीत टाकून द्यावा. पाणी टाकणें तें घरांतील जमिनीवर किंवा जिकडेतिकडे न टाकतां मोरींत टाकावें.

 घराच्या सभोवती किंवा निदान मागें अगर पुढे बरीच मोकळी जागा असावी. तेणेंकरून घरांतील हवा शुद्ध होण्यास ठीक पडतें. घरें एकमेकांस लागून असणें हें कांहीं बरें नाहीं. त्यापासून हवा दूषित होते. घराच्या जवळच पण जरा लांब शौचकूप असावें. तें नेहमीं स्वच्छ ठेवण्याची व्यबस्था ठेवावी. त्यांतील मैला वेळच्यावेळीं दूर होण्याची व्यवस्था करावी व शौचकूपांतील घाण घरांत न येईल अशा तऱ्हेनें तें असावें. तसेंच घोड्याचा तबेला व गाईचा गोठा घरापासून जरा दूर अंतरावर असावा. त्यांतील मलमूत्र वेळच्यावेळी काढून टाक- ण्याची तजवीत ठेवावी, व त्याची घाण हवेबरोबर घरांत पसरूं नये; अशा तऱ्हेनं तीं बांधलेली असावीं. असो. वरील विवेचनावरून आरोग्य प्राप्त व्हावयाला आपले घर किती शुचिर्भूत व नीटनेटकें पाहिजे हैं आपल्या लक्ष्यांत आलेच असेल.

१३- मितपणा.

 प्रकृति निरोगी राहून आयुष्य दीर्घतर व्हावे असे इच्छिणारांनी प्रत्येक गोष्टींत मितपणा राखणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जी जी ह्मणून गोष्ट करितों, उदाहरणार्थ; खाणें, पिणें, अभ्यास करणें, झोंप घेणें, उद्योग करणें, वगैरे वगैरे त्या प्रत्येक गोष्टींत मितपणा ठेविला नाहीं तर प्रकृति बिघडून शरीर रोगी होतें.