पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

६७


घाणेरड्या * वस्तु घरांतील विस्तवांत टाकूं नयेत. कारण त्यांच्या जळण्यानें उत्पन्न होणारे पदार्थ शरीराला विघातक असतात. स्वयं- पाकघर स्वच्छ ठेवावें. तेथें अडगळीचें सामान ठेऊं नये.

 रात्री उजेडासाठीं जो दिवा लावावयाचा तो वान्यानें न मालवेल अशा जागीं घराच्या आजुबाजूच्या खिडक्या उघड्या ठेवून लाविलेला असावा. सर्व दारें आणि खिडक्या बंद करूं नयेत. त्यापासून हवा दूषित होऊन आरोग्य बिघडले जाते. माणसांमुळे जशी हवा बिघडते, तशी विस्तवापासून व दिव्यांपासूनहि बिघडते. दिव्यांच्या निरनिराळ्या प्रकारांसंबंधाने विद्यार्थ्यांचे आरोग्य' नांवाच्या आमच्या पुस्तकांत बिस्तारपूर्वक वर्णन दिले असल्याने येथें पुनरावृत्ति करीत नाहीं.

 निजण्याच्या खोलीत मोरी नसावी. घरांतील मोन्या नेहमी स्वच्छ असून त्यांत खाडे असूं नयेत. पाणी लगेच जाईल अशी त्यांची जमीन केलेली असावी. मोन्यांच्या भोंकाला जाळ्या बसविलेल्या असा- व्यात. मोरींत केरकचरा टाकं नये. निजण्याच्या खोलीत सामानाची अडगळ नसावी. आंगावर वारा न येईल पण हवा मोकळेपणे फिरेल अशा तऱ्हेनें खोलीत व्यवस्थेनें निजावें. जेथें चिलटांचा त्रास असेल तेथील मंडळीनें मच्छरदाणी घालून निजावें. ज्यांनां मच्छरदाणी घालण्याची ऐपत नसेल, त्यांनी आमच्या 'रोगजंतु' पुस्तकांत हिंवतापाच्या प्रकरणांत चिलटांचा त्रास न होण्यासाठी जे उपाय सांगितले आहेत ते योजावेत. घराच्या जमिनी, भिंती, कडा, कोनाडे, सामान, तसबिरी, पुस्तकें वगैरेवर धुरळा, केरकचरा, कोळिष्टकें, जीवजंतु असतात;

तीं जर आपण रोज झाडून स्वच्छ केली नाहीत तर त्यांचा जमात्र होतो


  • नामेध्यं प्रक्षिपेदनौ-मनु.

अर्थ:- अशुद्ध पदार्थ अग्नीत टाकूं नयेत.