पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

जरूरीप्रमाणे उघडझांक करण्यास ठीक पडेल. विस्तवापासून जसा धूर वर जातो त्याप्रमाणे श्वासावाटे जी हवा आपण बाहेर टाकितों, ती उष्ण असल्यामुळे वर जाते. या हवेस बाहेर निघण्याकरितां छपराजवळ भोंकें असली पाहिजेत. हें खिडक्या आणि दरवाज्यांच्या वर केलेल्या झडप्यांनी ( व्हेनिशियन ) बरेंच होतें. प्रत्येक मनुष्याला कमीतकमी एक हजार घनफूट जागा पाहिजे. ह्मणजे १० फूट लांब, १० फूट रुंद व १० फूट उंच अशी जागा असावी. आपल्या हिंदुस्तानासारख्या उष्ण देशांत थंडपणा वाटण्यासाठी उंची १५ फूट किंवा त्याहून जास्त असावी. शुद्ध हवा व उजेड येण्याची व्यवस्था असल्यास याहून किंचित् थोडी जागा असल्यास चालेल. शुद्ध हवेप्रमाणेच ज्या घरांत उजेड नसेल तेथें दुखणें आल्याशिवाय रहात नाहीं, ही गोष्ट कोणीहि विस- रतां कामा नये. घरांतील केरकचरा, फळांच्या साली, भाजीचे डेंख, राख, चिंध्या, रद्दी कागद हीं जिकडेतिकडे घरांत टाकूं नयत, अगर कोनांत किंवा दरवाज्याशी त्यांचा ढिगारा रचूं नये. त्यापासून आरोग्य बिघडतें, असे निरुपयोगी पदार्थ म्युनिसिपालिटीच्या कचन्याच्या पेटीत टाकावेत. तशी सोय नसल्यास घराबाहेर जाळून टाकावेत. स्वयंपाक करण्यासाठी स्वतंत्र जागा असावी व ती घराबाहेर लागूनच अस- लेली बरी. निजण्याच्या किंवा वसण्या उठण्याच्या खोलीतच स्वयंपाक करूं नये. कारण त्यामुळे घरांत धूर होतो, घरें काळी होतात, डोळे बिघडतात व हवा दूषित होते. जेथें स्वयंपाकासाठी स्वतंत्र सोय नाहीं, अशा माणसांनीं निदान स्वयंपाक करण्याच्या खोलीचीं सर्व दारें आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. ज्यांनां सोय असेल, त्यांनी स्वयंपाक- खोलीला धुराडें ठेवून त्याखाली विस्तव पेटवावा ह्मणजे धूर बाहेर जाण्यास ठीक पडतें. कारण, धुराची गती वर जाण्याची असते.