Jump to content

पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

ल्यानें शरीर निरोगी रहातें व सकाळी उठल्यावर आदल्या दिवशीं झालेल्या श्रमांनी आलेला थकवा न वाटतां मनाला हुपारी वाटते. जे लोक सारा दिवस पडून रहातात, मेहनतीचें काम करीत नाहीत किंवा ज्यांनां मानसिक श्रम फार पडतात, अशा लोकांना झोपेचें खरें मुख मिळत नाहीं. चांगली झोंप यावयाला उत्तम उपाय ह्मणजे दिवसा शारीरिक श्रम केले पाहिजेत. निजतांना आपल्या सर्व चिंता मनांत आणून विचार करीत राहूं नये. शांतपणें निजावें. निजण्याची जागा स्वच्छ व हवाशीर असून गडबड, गोंगाट आहे अशी नसावी. अंथ- रुणांतील कपडे घामट व मलीन असूं नयेत. रात्रीचें जेवण हलकें असावें. जेवणानंतर लगेच निजूं नये. निदान दोन तास तरी मध्ये गेले पाहिजेत. निजण्याची जागा उंच (खाट वगैरे) असावी, होतांहोईतों जमिनीवर निजूं नये. जेव्हां जमीन कोरडी असते व आसपास तापाचा आजार नसतो, अशा वेळीं कदाचित् इजा होणार नाहीं; पण जमीन सर्द असल्यास त्यापासून दुखणें येतें. कारण, वाईट हवा विशेषेकरून सखल जागेत असते. तसेंच सखल जागेत जमिनीचा ओलावा व रोगजन्य धुरळ्याचा संपर्क घडूं शकतो. शिवाय पिसवा, ढेकूण, मुंग्या, विंचू, साप, वगैरे प्राण्यांचाहि त्रास होतो. ह्मणून सखल जागेत निजणें वरें नाहीं.

 सवय नसलेल्यांनी एकदम उघड्या जागेत किंवा आगाशीवर निजूं नये. तसेंच खोलीची दारें आणि खिडक्या बंद करून निजूं नये. अंगावर वान्याचा झोत न येईल अशा रीतीनें खिडक्या उघड्या ठेऊन निजावें. चिलटांमुळे त्रास होत असल्यास मच्छरदाणी घालून निजावें. अतीशय विचारांमुळे, अभ्यासाने किंवा अशाच दुसऱ्या कारणांनी मेंदू तप्त झाला असतां लगेच निजूं नये. कारण, त्यामुळे झोप येत नाहीं. अशा वेळीं निजण्यापूर्वी डोक्यावर थंड पाणी घालून तें पुसावें व पायांच्या