पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

कपड्यांवर पडतात त्या वेळीं असतें. सावलींत तितकें जास्त शोषण होत नाहीं. म्हणून कोणाला काळ्या कपड्यांची आवडच असली, तर त्यांनीं ते घरांत असतां वापरावेत. स्टार्क नांवाच्या विद्वान गृहस्थानें असें सिद्ध केलें आहे, कीं, काळसर व गडदरंग असतात ते सुगंध व दुर्गंध वायूंस फार त्वरित शोषण करितात. त्यांतहि गडद काळे रंग या बायूंस फार शोषण करितात. त्याच्या खालोखाल निळा, जांभळा व पिंवळा रंग यांचें शोषक कार्य घडतें. पांढरा रंग सर्वांत कमी शोषण करितो. सुताच्या आणि तागाच्या कपड्यांपेक्षां लोंकरीचे कपडे या वायूंस त्वरित शोषण करितात. म्हणून पांढरे कपडे वापरण्यास हें एक विशेष कारण आहे.

 धोबी लोक कपडे धुतल्यावर त्यांस ताठरपणा व चकाकी आणण्या- साठीं खळ लावतात; परंतु त्या योगानें कपड्यांचा मुख्य गुण जी सच्छिद्रता ती नाहींशी होते. कारण खळीनें कपड्यांतील छिद्रे भरून जातात व त्यामुळे त्यांचा पृष्टभाग अभेद्य होतो. यासाठीं खळ घालून घेऊं नये. शेवटी एक गोष्ट सांगणे राहिली, ती ही, कीं, एकसारखें दिवसरात्र कपडे घालून राहूं नये अशी सवय केल्यास एकाद्या वेळीं आंगावर कपडे नसल्यास शरीरास बाधा होण्याचा संभव असतो ह्मणून घरांत आल्यावर विशेष सोसाट्याचा वारा किंवा फार थंडी नसतां उघडें रहाण्याची सवय ठेवावी, ह्मणजे तशी बाधा होणार नाहीं.

११-झोंप.

 दिवसा आपण जे जे उद्योग करितों, त्यांमुळे शरीराला झालेले श्रम परिहार होऊन शरीर पुनः काम करण्यास ताजेतवाने व्हावें, यासाठीं सृष्टिकर्त्यानें झोंपेची योजना केली आहे. झोंपेला सर्वांत उत्तम व शांत अशी वेळ ह्मटली ह्मणजे रात्र होय. रात्रीं सुश्रांत झोंप मिळा-