पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

च वरचेवर बदलणें या गोष्टी अगदी नियमानें पाळल्या पाहिजेत. कपडे मळकट दिसूं लागले म्हणजेच बदलावयाचे व ध्रुवायाचे असें न करितां बदलण्याच्या व धुण्याच्या वेळा अगदी ठरवून टाकाव्या. तात्पर्य, प्रकृति निरोगी रहाण्यासाठी ऋतुमानाप्रमाणे व हवेच्या फेरफारा- प्रमाणें धोरण ठेवून कपडे घालण्यांत फेरबदल केला पाहिजे. कोणी म्हणतील, कीं, आम्ही गरीब, आम्हांला अशा किंमतीचे कपडे घेण्याचें सामर्थ्य नाही. पण अशा लोकांनी एवढें लक्ष्यांत ठेवावें, कीं, दुखणें आले असतां त्यांस जो खर्च होतो, तो पाहूं गेल्यास अशा कपड्यांच्या किती तरी पटीने जास्त असतो. ह्मणून भारी किंमतीचे व सुंदर दिस- णारे कपडे जरी घेतां आले नाहीत, तरी जाडेभरडे कमी किंमतीचे पण योग्य असे कपडे घेण्यास मुळींच हयगय करूं नये. मिळालेला सर्व पैसा-मग तो थोडाथोडका का असेना, दागिने करण्यांत किंवा व्याज लाऊन अडकवून टाकण्यापेक्षा त्यांपैकी काही प्रकृतीच्या स्वास्थ्या- करितां योग्य ते कपडे करण्यांत खर्च केल्यास कधीहि वावगे होणार नाहीं.

 कपड्यांसंबंधानें आणखी एक गोष्ट सांगणे जरूर आहे, ती ही, कीं, पुष्कळ लोक रंगीबेरंगी कपडे घालतात. कांही रंग तयार करितांना त्यांत सोमलासारखी विषारी द्रव्ये घालावी लागतात. असे रंग बहुत- करून लाल, हिरवे व गुलाबी असून भडक व तकतकीत असतात. रंगांतील विषारी द्रव्यांपासून त्वचेस व कधीकधीं सर्व शरीरास अपाय होतो. साधा पांढरा रंग किंवा एकादा साधा फिक्कट झांकीचा रंग हे नेहमीं योग्य, निर्भय, अतीशय स्वच्छ व हितकारक असतात. थंडाई राखण्यास पांढरा रंग उत्तम; त्याच्या खालोखाल फिकट पिवळा असतो. काळा रंग सर्वांत गरम असतो; कारण तो पांढऱ्या रंगाच्या दुप्पट उष्णता शोषण करितो. मात्र हें अंतर सूर्याचे किरण प्रत्यक्ष