Jump to content

पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?
५२

 अर्थ:- डोळे चांगले असावेत असें इच्छिणारानें शरीरप्रकृति निरोगी असतां देखील जव, गहूं, साळी, साठेसाळ व हरीक हीं जुनीं धान्ये व मूग वगैरे कफ पित्त यांचा नाश करणारी धान्यें, हीं पुष्कळ तूप घालून खावींत. तसेंच अशाच प्रकारची भाजी, जांगलमांस, डाळींब, खडिसाखर, सैंधव, त्रिफला, मनुका हे पदार्थ व पिण्यासाठी पावसाचें पाणी, छत्री, जोडा व शास्त्रोक्त रीतीनें दोषांचें शोधन, हीं करावीत.

 डोळ्यांचे पुष्कळ रोग एकाचे दुसन्यास लागतात. यासाठी ज्यांनां डोळ्यांचा विकार असेल त्यांचा हातरुमाल, टॉवेल, पंचा, धोतर, उशी, अंथरूण वगैरे वस्त्रे कधींहि वापरू नयेत.

 एकंदरींत, डोळ्यासंबंधाची लहानसहान जरी बाबत असली, तरी तिकडे किंचिहि दुर्लक्ष्य न करितां योग्य उपाय व खबरदारी घेण्यास चुकूं नये. वर सांगितल्याप्रमाणें व्यवस्था ठेविल्यास डोळे शाबूद रहातील, यांत शंका नाहीं.

कर्णेद्रिय.

 डोळ्यांप्रमाणेंच कानांसंबंधानेंहि काळजी घेतली पाहिजे. आपले क़ान जर बधिर असले, तर दुसऱ्यांनां ओरडून बोलावें लागतें व लोक काय बोलतात तें आपल्याला ऐकू येत नाहीं. म्हणजे त्यापासून स्वतःला च लोकांना दोघांनांहि त्रास होतो. मुले लहानपणीं कान खाजूं लागला म्हणजे किंवा उगीच मौजेनें स्वतःच्या किंवा दुसऱ्या मुलांच्या कानांत काड्या घालतात. त्यामुळे आंतील नाजुक पडद्यास इजा होऊन कान दुखूं लागतो, चैन पडत नाहीं, अस्वस्थता, ताप वगैरे लक्षण होतात. पुढें पू वाहू लागतो, घाण मारते व ऐकूं येण्याचें कमी होतें. कित्येकदां ही सूज मेंदूच्या पडद्यांत जाऊन मूल अत्यावस्थ होतें. या- साठी कानांत काड्या किंवा इतर दुसरे पदार्थ न घालण्यासंबंधाने