Jump to content

पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

५३

वडील माणसांनी मुलांकडे अवश्य लक्ष्य दिले पाहिजे. पुष्कळदां मोठीं माणसें देखील कानांत झालेला मळ काडी घालून किंवा रस्त्यावर फिरत असलेल्या मळकाढ्या अडाणी लोकांकडून काढून घेतात; त्यापासूनहि कानाच्या पडद्यास इजा होऊन वरीलप्रमाणेंच त्रास भोगावा लागतो. कानांतील मळ काढण्याची सोपी युक्ति म्हणजे आदल्या दिवशीं सोडा बायकार्ब व थंड पाणी अशीं एकत्र करून तें मिश्रण कानांत घालावें. म्हणजे मळ सुटा होतो व दुसऱ्या दिवशीं कांचेच्या पिचकारीनें हळु- हळू कोमट पाण्यानें कान धुवून काढावा ह्मणजे मळ निघून कान साफ होतो. अशाच रीतीनें कानांत एकादा प्राणी गेल्यास कान धुवून काढावा. कानाचा आंतील पडदा फार नाजुक असतो. यासाठी कानावर जोरानें थप्पड मारल्यानें तो फुटण्याचा बराच संभव असतो ह्मणून असें न करण्याची खबरदारी घ्यावी. मोठ्या आवाजानेंहि बधिरता येते. रोज कानांत तेल घालावें. यापासून कर्णेद्रियाची शक्ति अधिक बळकट होते. अलीकडच्या पुष्कळ मंडळीला कानांत तेल घालणें आवडत नाहीं. आर्यवैद्यककार ह्मणतात: – शिरः श्रवण पादेशु तं विशेषेण शीलयेत्। डोक्याला व पायाप्रमाणेंच कानालाहि तेलाचा उपयोग करावा.

घ्राणेंद्रिय.

 नाकाला घ्राणेंद्रिय असें ह्मणतात. यापासून आपल्याला बरावाईट वास समजतो. ज्या ज्ञानतंतूमुळे हें ज्ञान आपल्याला कळतें त्या तंतूचे असंख्य फांटे नाकाच्या आंत सर्वत्र पसरलेले असतात, आणि त्यामुळेच आपल्याला सुगंधदुर्गंध समजतात. घाण आली ह्मणजे आपण स्वाभा- विकच नाक दाबून धरतों. घाणेरडी हवा शरीराला अपायकारक असते, ह्मणून ही क्रिया नैसर्गिक होत असते. आपण जर तपकीर ओढण्याची सवय लावली किंवा घाणेरड्या हवेंत राहूं लागलों, तर घ्राणेंद्रियाची