पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
मी निरोगी कसा राहीन ?

अन्नपान, तंबाकू ओढणें, वगैरे होत. यासाठीं अशा गोष्टींपासून दूर राहिलें पाहिजे. बारीक टायपाचीं पुस्तकें व तीहि फार वेळ वाचू नयेत. डोळ्यांनी बरोबर दिसत नसले तर योग्य अधिकारी वैद्याकडून डोळे तपासून घेऊन चष्मा लावावा. अशा वेळीं चष्मा आज लावूं उद्यां लावूं ह्मणून लांबणीवर टाकणें कधींहि बरें नाहीं. कमी प्रकाशांत वाचूं नये; तसेंच बत्तीसमोर डोळे करून किंवा निजून वाचूं नये. पुस्तकावर उजेड पडेल अशा रीतीनें बत्तीकडे पाठ करून बसावें. गाडींत बसून कधींहि वाचूं नये. पुष्कळ लोक अशा रीतीनें वाचतांनां आढळतात; पण हें कांहीं बरें नाहीं. कारण गाडी एकसारखी हलल्यानें पुस्त- कावर नजर टिकत नाहीं. शिवाय प्रकाश न्यूनाधिक होत असतो. त्यामुळे डोळे दिपावतात; पुस्तकावर कधीं एका बाजूनें तर कधीं दोन्ही बाजूंनी उजेड पडतो; इतकेंच नाहीं, पण गाडी हालत असल्या- मुळे पुस्तक नेत्रांपासून ज्या अंतरावर रहावें त्या अंतरांत फरक होतो; आणि त्यामुळे पुस्तकावर नजर बरोबर ठरत नाहीं, व त्यापासून डोळ्यांस जास्त मेहनत होते. तंबाकू ओढूं नये. कारण त्याचा धूर डोळ्यांस लागून डोळे बिघडतात. शिवाय फुफ्फुस, अन्नमार्ग, हृदय, मेंदू वगैरे इंद्रियें बिघडतात तीं निराळींच. दारू पिऊं नये. जागरण करूं नये. मलावरोध होईल अशी कारणे टाळावीत. रात्रंदिवस एक सारखी पुस्तकें वाचीत राहूं नये. डोळ्यांनां विश्रांति द्यावी. डोळ्यांस अतीशय थंड किंवा उष्ण हवा अगर सोसाट्याचा वारा लागूं देऊं नये. तसेंच डोळ्यांत केरकचरा, धूळ हीं न जातील अशी खबरदारी घ्यावी. कदाचित् धूळ, कचरा गेलाच तर डोळे चोळूं नयेत. डोळ्यांत कांहीं गेलें ह्मणजे आपोआपच डोळ्यांत जास्त पाणी सुटून बहुतकरून त्याबरोबर तें निघून जातें. कित्येकदां रजःकण पापणीखाली व बुब्बुळावर जाऊन बसतात,