पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

४९

९ - ज्ञानेंद्रियें.

 ज्यांच्याद्वारें बाह्यपदार्थाचें ज्ञान मनाला होतें, त्यांनां ज्ञानेंद्रियें असें ह्मणतात. ही पांच आहेत. चक्षुरिंद्रिय, कर्णेद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय व स्पशेंद्रिय. यांपैकीं शेवटचें ह्मणजे स्पर्शेद्रिय यासंबंधाचें विवेचन स्नानाच्या प्रकरणांत केले असल्याने बाकींच्या संबंधानें अनुक्रमानें विचार करूं.

चक्षुरिंद्रिय.

 सर्व संपत्तींत शरीरसंपत्ति मुख्य आहे आणि त्यांतहि डोळे शाबूत असणें, यासारखें दुसरें सुख नाहीं. ह्मणून प्रत्येकानें डोळ्यांचें संरक्षण अवश्य केले पाहिजे. डोळ्यांत कचरा पडला, लहानशी जखम झाली किंवा डोळे आलेले असले अगर त्यांस दुसरा कसला विकार झालेला असला, तर वेळ न घालवितां वैद्याचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपाय योजले पाहिजेत. कांहीं लोक अशा बाबी क्षुलक समजून दुर्लक्ष्य करि- तात; त्यामुळे त्यांचे डोळे बिघडून अंधपणापर्यंत पाळी येते.

 डोळे बिघडण्याला जीं कांहीं कारणे आहेत, त्यांपैकी मुख्य झटली झणजे बारिक टायपाची पुस्तकें वाचणें, डोळ्यांला चष्माची जरूरी असतां तो न लावितां वाचणें, प्रकाश बरोबर नसतां वाचणें, डोळ्यां- समोर बत्ती ठेवून व फार प्रकाशांत वाचणे, धांवत्या गाडीत आणि त्यांतहि

रेल्वेगाडींत बसून वाचणें, उन्हांत अनवाणी चालणें, जागरण, अयोग्य


 * नाधीयीताश्वमारूढो न वृक्षं न च हस्तिनम् ॥  न नावं न खरं नोष्टं नेरिणस्थो न यानगः ॥ १ ॥-मनु.  अर्थः - घोडा, वृक्ष. हत्ती, नौका, गाढव, ऊंट, उषरभूमी, यान ( गाडी, रथ, मेणा इत्यादि ) यांजवर आरुढ होऊन अध्ययन करूं नये. -