पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?
४८

 देण्याऐवज असल्या वाईट फंदांत मोहानें पडणें ह्मणजे आपल्या जन्माचें मातेरें करून घेणें होय.

 वृद्धावस्थेत किंवा दुखण्यांतून उठल्यावर अगर फार चालून आल्या- वर चहा घेतल्यानें श्रमपरिहार होऊन सुख होतें. अशक्त माणसांनां कांहीं दिवस कॉफी दिल्यानें वरें पडतें. कोकोमध्ये चहाकॉफीइतका उत्तेजकपणा नसल्यानें चहा पिणारांचें समाधान होत नाहीं. चहाकॉफी संबंधानें मुख्य गोष्ट सांगावयाची म्हणजे तीं पेयें घेणेंच झाल्यास आमच्या अग्निमांद्य पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे तयार करून योग्य प्रसंगींच ध्यावीत. तसेंच त्या पदार्थांत भेसळ द्रव्यें असतां कामा नयेत. अलीकडे चहाकॉफींतच काय, पण तांदूळ, तेल, लोणी, तूप, दूध वगैरे पदार्थात नफा मिळविण्यासाठीं दुकानदार निरनिराळ्या तऱ्हेनें भेसळ करितात. त्यामुळे खाण्याचे पदार्थ निर्भेळ मिळणे कठीण झाले आहे. यासाठीं खाण्याची प्रत्येक वस्तु काळजीपूर्वक पाहून घेणे अत्यंत जरूरीचें आहे अलीकडे पुष्कळ माणसें भूक लागलेली असतां चहा, सोड्यासारखीं पेयें पितात हें बरें नाहीं. आर्यवैद्यककार म्हणतात: तृषितस्तु नचाश्नी- यात् क्षुधितो न पिबेत् जलम् | तृषितस्तु भवेद्गुल्मी क्षुधितस्तु जलोदरी ॥ याचा अर्थ तरी हाच होय. असे केल्यानें रोगोत्पत्ति होते.

 आपल्या समाजामध्ये बायको नवऱ्याचें उच्छिष्ट खात असते, मुलांनां वडील माणसांच्या उष्टया पानावर जेऊं घालतात व उष्टें अन्न भिकाऱ्यांस घालतात असे बऱ्याच ठिकाणी आढळून येतें. खरो- खरी पाहिल्यास ही चाल फार वाईट आहे. या निंद्य चालीमुळे पुष्कळ वेळां बायकामुलांनां आणि गरीब भिकाऱ्यांना अनेक रोग होण्याचा संभव असतो. आपल्या धर्मशास्त्रांत 'नोच्छिष्टं कस्यचिद्दद्यात्' असें जें झटले आहे त्याचा अर्थ हाच होय.