पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

शेपोटीं चहा पिणें फार वाईट आहे. चहा हें एक थोडेंसें उत्तेजक पेय आहे खरें; पण त्याचा रोज अन्नाप्रमाणें उपयोग केल्याने त्यापासून क्षुधा मंद होते, व अग्निमांद्य जडते. चहाची एकदा सवय लागली ह्मणजे तो आपल्याला हवासाच वाटतो व न मिळाल्यास कसेंसेंच वाटतें, गळल्या- सारखें होतें व डोकें दुखूं लागते. ह्मणून अशा या पेयाची सवय लाऊन घेऊं नये. मुलांनां तर याची मुळींच सवय करूं नये. तसेंच त्यांना खाऊसाठी पैसे देऊं नयेत. खाण्यासाठीं जें द्यावयाचें तें घरीं करूनच द्यावें. पैसे दिल्यानें मुले दुकानांतील खाऊ घेतात. हा खाऊ त्यावर माशा बसल्यानें व चहासारखे पेयपदार्थ ज्या बशीप्याल्यांतून देतात ते बशीप्याले हजारों लोकांच्या तोंडास लागल्यानें निरनिराळे रोग होण्याचा संभव असतो. चहाच्या ऐवजी सकाळी एकादें पेय घेणें झाल्यास सातूचें पाणी, तांदळांची पातळ कणेरी, किंवा वाग्भटांत सांगि- तल्याप्रमाणे पाणी, दूध, मध, तूप यांपैकी कोणताहि एक पदार्थ अथवा कोणत्याहि दोहोंचें, तिहींचें किंवा सर्वांचे मिश्रण करून सकाळी प्याल्यास प्रकृति निरोगी राहून आयुष्यहि वाढेल.

 जेवणानंतर विशेषतः जडान्न झाल्यावर सुपारी किंवा विडा खाल्ल्यानें तोंड साफ होतें, ही गोष्ट खरी आहे; पण अशा पदार्थांचा फार उपयोग केल्यानें तोंडाची चत्र नाहींशी होऊन दांत किडले जातात. तंबाखु, भांग, गांजा, अफू, दारू हे पदार्थ एकाहून एक अपायकारक आहेत. अशा पदार्थांचा योग्य वेळी औपचाप्रमाणें उपयोग होईल, पण यांची सवय विघा- तक आहे. मुलांनां तर यांची व वर सांगितलेल्या पदार्थांची मुळींच सवय लाऊं नये.कारण ज्यांच्या शरीराची इमारत नुकती कोठें बांधली जात आहे, अशा कोंवळ्या व तरुण मंडळीने आपले शरीर भक्कम करण्याकडे लक्ष