पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
मी निरोगी कसा राहीन ?

जेवणांत, निरनिराळ्या भाज्या, फळे, दूध, ताक, दहीं, लोणचीं, वगैरे पदार्थ असावेत. तसेंच त्या त्या ऋतूंत उत्पन्न होणारे पदार्थ असा- वेत. कच्चीं, फार पिकलेली किंवा कुजलेलीं फळे खाऊं नयेत. अन्न खाणें तें ऋतुमानाला अनुसरून असावें. उदा० उन्हाळ्याचे दिवसांत भूक मंद असल्यानें अन्न कमी खाल्ले पाहिजे. हिवाळ्याचे दिवसांत भूक तीव्र असते त्यामुळे अन्न जास्त खपतें. अन्न खाणें तें अतीशय ऊन किंवा अतीशय थंड नसून साधारण गरम असावें. तसेंच शिळे किंवा बासें नसून आवडतें असावें. दुधासारखे पातळ पदार्थ हळुहळू रुचीनें प्यात्रेत. एकदम पिऊन टाकूं नयेत. जेवणांत पाणी पिणें तें तांब्याचा तांब्या गटागट न पितां फार थोडें प्यावें व जास्त पिणें तें जेवण झाल्यावर दोन- तीन तासांनी प्यावें.

 उन्हांतून श्रमून आल्यावर तहानेचा जो शोप लागतो तो शम- विण्यासाठीं लगेच गटागट पाणी पिऊं नये. थोडावेळ विश्रांति घेऊन नंतर प्यावें. आपल्यामध्यें अशा वेळीं गूळ किंवा साखर खाऊन वर पाणी पिण्याची जी वहिवाट आहे, ती फार उत्तम आहे.

 दिवसा झोंप घेणें बरें नाहीं. रात्री जेवण होतांच निजूं नये. मध्ये कांहीं वेळ जाऊं द्यावा. कारण तसे केल्यास पचनक्रिया बिघडून अन्न चांगले जिरत नाहीं, झोंपेंत व्यत्यय येतो, व स्त्रप्में फार पडतात. अजीर्ण वाटल्यास उपवास करावा.

 हल्लीं सकाळीं उजाडलें नाहीं तोंच चहा, कॉफी वगैरे पेयें पिण्याची चाल पडत चालली आहे. दिवसांत कोणाकडे गेलें तर आदरातिथ्य ह्मणून चहा पाजतात. ही चाल फार वाईट असून ती लवकर नाहींशी होईल तितकें बरें. खरें पाहूं गेल्यास चहा हें कांहीं अन्न नव्हे. त्यापासून कोणाचें अडेल असें नाहीं. जेवावयास उशीर आहे ह्मणून किंवा अन-