पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

खालीं सारतात. एकंदरींत, या धातुक संवयींमुळे अन्नाची नासाडी व्हावयाची होऊनहि शिवाय मुलाच्या शरीराचें मातेरें होतें.कांहीं ठिकाणीं मुलांनां लवकर जेवण न घालतां रात्र करितात. इतक्यांत मुलें झोंप- तात. मग आई मुलांनां उठविते. तीं झोपमोड झाल्यानें एकसारखीं रडत असतात. अशा अर्धवट झोपेच्या स्थितींत असतांना आई मुलांच्या घशांत अन्न कोंबते व खाईनाशीं झालीं ह्मणजे वर मार देते. हा ववर सांगितलेले प्रकार फार वाईट होत. याचप्रमाणे मोठ्या माणसांनींहि एकादा पदार्थ भूक नसतां पुनः मिळणार नाही ह्मणून अगर फुकट जातो ह्मणून खाणें अगर जेवणांत शर्यत लावणें यापासूनहि शरीराची हानि झाल्याशिवाय रहात नाहीं. मितप्रमाणानें अन्न खाल्लें ह्मणजे तें चांगले पचलें जाऊन मलशुद्धीहि साफ होते. असा मल पाहिला तर तो पिंवळ- सर रंगाचा असून मऊ व बांधिव असतो, त्याला घाण फार नसते, त्याच्या सर्व बाजूंनी एकप्रकारचा बुळबुळीत पदार्थ लागलेला असतो, व असा मल बाहेर पडतांना त्याच्या संपर्कानें मलद्वार मुळींच खराब होत नाही. अन्नपचन बरोबर होत नसले ह्मणजे त्यापासून कधीं मला- वरोध तर कधीं भसरें शौचाला होतें.

 साधारणपणे रोजचें साधें अन्न पचण्याला सुमारे चार तास लाग- तात. जडान्न असल्यास त्याहून जास्त वेळ लागतो. प्रत्येक जेवणामध्ये निदान पांच तासांचें अंतर असावें. मुलांनां तीन तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी ठेऊं नये. जेवणाच्या ठराविक वेळांशिवाय मध्ये थोडथोडें खात राहूं नये. जेवणानंतर थोडा वेळ विश्रांति घ्यावी. रोज

एकाच प्रकारचें अन्न खाऊं नये. त्यांत मधुनमधून फेरबदल करावा. *


  • प्रकृति चांगली असतां रोज तेंच तेंच अन्न खाल्ल्यानें इजा होतेसे वाटत

नाहीं; परंतु रोगास प्रतिबंध करण्याची शक्ति यानें कमी होते व दुखणें आलें ह्मणजे शरीरांतील व्यापार लवकर मंद पडतात.