पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
मी निरोगी कसा राहीन ?


आंग गरम होते व काविळीचा विकार जडतो. बरें, उचित प्रमाणाहून कमी अन्न खाल्ले तर घटकावयव झिजूं लागतात, चरबी हळुहळू कमी होऊं लागते, शारीरिक व मानसिक अशक्तपणा येतो व अशा स्थितीत एकादा रोग उदा०; दुष्काळज्वर, क्षय, न्युमोनिआ, किंवा दुसरे जंतु- जन्य रोग जडूं शकतात. अतिसार होण्याचा संभव असतो, डोळ्यांत क्षतें पडतात व देह अस्थिचर्म होतो. नेहमींच्या शरीराच्या वजनाच्या सुमारें ४० टक्के वजन घटले ह्मणजे मृत्यु येतो. तात्पर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावयाला मिताहारासारखे दुसरें साधन नाहीं.

 शरीराची पुष्टि ही केवळ उत्तम प्रकारचें अन्न खाण्यावरच नसून त्याच्या पचनावर अवलंबून असते. याच कारणामुळे उत्तम अन्न सेवन करणाऱ्या श्रीमंतांपेक्षां जाडेभरडें अन्न खाणाऱ्या मजुराची शरीरप्रकृति जास्त चांगली असते. ह्मणून अन्न उत्तम रीतीनें पचन व्हावयाला तें तोंडांत घातल्यावर स्वस्थपणे चांगल्या रीतीनें चर्वण करूनच खाल्ले पाहिजे. कारण, भिंतीला लावावयाचा गिलावा ज्याप्रमाणें उत्तम रीतीनें मळून आधीं बारीक केलेला नसला, तर तो जसा भिंतीला चांगला चिक- टून बसत नाहीं, त्याचप्रमाणें अन्नाचें उत्तम रीतीनें व सावकाशपणे चर्वण न झाल्यास तें आंगीं लागत नाहीं व उलट अपचन होतें. हें तत्त्व पुष्कळ लोकांनां न समजल्यामुळे त्यांचें फार नुकसान होतें. पुष्कळ मुलांच्या आई आपला वेळ जातो ह्मणून मुलांनां लवकर जेवण्याचा तगादा लावितात व निरनिराळ्या तऱ्हेनें भीति घालतात. याचा परिणाम असा होतो कीं, मुलें अन्न न चावतां गिळून टाकतात. अशा रीतीनें अन्न न चावतां गिळण्याची सवय झाली ह्मणजे पुढे ती सुटणें कठीण जातें. कांहीं मुले अन्न लवकरलवकर गिळूनहि जर दुसऱ्या मुलांच्या अगोदर उठतां येईनासें झालें, तर आईचा डोळा चुकवून भात पाना-