पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

वनस्पतिजन्य अन्न शिजविल्याने पचनाला मुलभ पडतें; पण मांसा- सारखें अन्न शिजविल्यानें पचनाला अधिक जड जातें मांसासारखे पदार्थ कांही वेळानें सडूं लागतात. यासाठी आणतांना ताजे असतील असेच आणावेत.

 जेवण्याची व स्वयंपाकाची जागा स्वच्छ हवाशीर असून उजेडाची असावी. स्वयंपाकाची व जेवण्याची भांडी स्वच्छ धुतलेली असावीत. स्वयंपाक करणारा व वाढणारा शुचिर्भूत असावा. गांवभर हिंडून आल्यावर *हातपाय व तोंड न धुतां तसेंच किंवा मलीन वस्त्रानें जेवावयास बसूं नये. जेवतांना राग, द्वेष, चिंता वगैरे गोष्टींनीं मन व्यग्र नसावें. कारण त्यापासून खाल्लेले अन्न आंगी लागत नाहीं. ह्मणून जेवतांना मन आनंदी व उल्लसित असावें. अन्न खाण्यांत घाई मुळींच न करितां स्वस्थपणे जेवावें. जेवण्याची वेळ होतां होईतों नियमित असावी. अवेळी खाल्लेले अन्न हितावह होत नाहीं. मिता- हारानें अग्नि प्रदीप्त रहातो. जडान्न असल्यास अर्धे पोट भरेपर्यंत व हलकें अन्न असल्यास किंचित् जागा राखून पोटभर खावें. सुखानें जिरेल तितकेंच आहारमानाचें प्रमाण समजावें. वाजवीपेक्षां फाजील किंवा मध्ये कांहीं वेळ जाऊं न देतां अन्न खाल्ल्यानें तें पचलें न जातां अन्न- मार्गांत कुजले जाते व त्यापासून अग्निमांद्य जडून मलावरोध किंवा अतिसार होतो. तसेंच आमवात, स्थूलदेह, मधुमेह आणि दुसरेहि विकार होऊं शकतात. आंतड्यांत अन्न कुजल्याने यापासून उत्पन्न झालेलीं विषारी द्रव्यें रक्तांत शोपिलीं जाऊन रक्त बिघडतें व निरनिराळे रक्तविकार

होतात. तसेंच जिभेवर पांढरा थर बसतो, श्वासाला घाण मारूं लागते,


 * हातपाय व तोंड धुवून स्वच्छ धुतवस्त्र नेसून भोजन करणाराला दीर्घायुष्य प्राप्त होतें. ( मनु - अ. ४ था. )