पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
मी निरोगी कसा राहीन ?

तर शेवटीं अशी वेळ येईल की, तिजमधील सर्व स्वच्छ हवा जाऊन श्वासोच्छुसनास फार अशुद्ध अशा हवेनें ती खोली भरेल आणि तिज- मध्ये असलेले प्राणी मरतील. ही स्थिति मोठ्या खोलीपेक्षां लहान खोलीस लवकर प्राप्त होईल. एका मोठ्या तोंडाच्या बाटलींत एकादा उंदीर घातला व त्या बाटलीचें बूच गच्च बंद केलें, तर तो थोडक्या वेळानें शुद्ध हवेच्या अभावामुळे मरून जाईल. यासारख्या स्थितीत मानवी प्राण्यांचीही पुष्कळ वेळां हीच दशा झालेली आहे. कलकत्ता येथील अंधारकोठडी व तिजमध्ये बळी पडलेले मनुष्य, हें याचें चांगलें उदाहरण आहे. ह्मणून जीवनास अत्यंत आवश्यक अशी जी शुद्ध हवा ती मिळण्यासाठी ज्या घरांत आपण रहातों त्या घरांतील प्रत्येक खोलीच्या भागाला बाहेरील शुद्ध हवा आंत येण्यासाठी व आंतील अशुद्ध हवा बाहेर जाण्यासाठी दारें आणि खिडक्या अवश्य असल्या पाहिजेत; आणि तसें केलें तरच आरोग्य प्राप्त होईल. हवेसंबंधाचे विशेष विवेचन पुढें घराच्या प्रकरणांत केलें असल्यानें हें इतक्यावरच संपवितों.

 तात्पर्य वरील सर्व प्रकार ज्यांत आहेत त्यालाच उत्तम अन्न म्हणायाचें.

 अन्न चांगले शिजविलेले असावें. अर्धकच्चें करपून गेलेलें नसावें. अन्न शिजविण्याचा मुख्य हेतु हा की, त्याचें मूळचें रूप बद- लून त्यांत विशेष स्वाद यात्रा. उदा० मांसासारखें अन्न शिजविण्यापूर्वी पाहिल्यास किळसवाणे दिसतें; पण तेंच मीठमसाला टाकून शिजविलें ह्मणजे तसें न वाटतां त्यांत विशेष स्वाद उत्पन्न होतो. तसेंच अन्न शिजविल्यानें तें शुद्ध होतें व तें कांही दिवस टिकवितांहि येईल, असें करितां येतें. अन्न शिजविण्यानें तें पचण्याला विशेष लायक होतें, असें कित्येक समजतात; पण ती त्यांची चुकी आहे. एवढी गोष्ट खरी, कीं,