पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

३९

ह्मणून आपल्या अन्नांत निरनिराळी फळे आणि पालेभाज्या असल्या पाहिजेत. मीठ हे आपल्या अन्नांत असावे लागतें. रक्ताला आणि घटकावयवांनां, तसेंच लाळेला, यांतील सोडा फार जरूरीचा असतो व जाठररसांतील लवणाम्लाला क्लोरीन फार उपयोगी असतें. म्हणून मीठ जर आपण खालें नाहीं तर कार्बोहैड्रेटस व औजस अन्न चांगलें पचत नाही. तसेंच निरनिराळ्या क्षारांच्या उणिवीमुळे स्कर्व्ह व अस्थि- वक्रता ( रिकेट्स ) सारखे रोग जडतात. यावरून मीठ व निरनिराळे क्षार किती आवश्यक आहेत, हे कळून येईल. शेवटीं राहिली हवा. अन्नपाणी कांहीं दिवस नसले तर चालेल; पण हवा न मिळाल्यास थोड्याच वेळांत आपण मरून जाऊं. शरीरांतील प्रत्येक इंद्रियाला आणि घटकावयवाला त्यांचें पोषण व वाढ होण्यासाठी लागणारी तत्त्वें आणि प्राणवायु हीं रक्तापासून मिळत असतात. आपण जे अन्न खातों तें अन्नमार्गावाटे पचून त्याचें रक्त बनतें, व फुप्फुसांत जो श्वास घेतों यावाटे हवेंतील प्राणवायू ( oxygen ) रक्तांत मिळतो. वर सांगि- तलेलीं शरीरांतील इंद्रियें आणि घटकावयव हे केवळ रक्तांतील पोषक भाग तेवढाच ग्रहण करितात असे नाही, तर आपल्यांतील झिजून नाश पावलेले निरुपयोगी पदार्थ रक्ताच्या प्रवाहांत लोटून देतात व ते बऱ्याच अंशानें उच्छासावाटे बाहेर पडतात. ह्मणून फुफ्फुस हें प्राण- वायु रक्तांत सोडून रक्तांतील मल बाहेर काढणारें एक प्रकारचें यंत्रच आहे असें ह्मणण्यास हरकत नाहीं. असो. अशी जी ही हवा ती जर आपणाला शुद्ध स्थितीत मिळाली नाहीं, तर आपले सर्व खाणें- पिणें व्यर्थ होय.

 आप,तेज, वायु, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी हवा हें एक मूलतत्त्व असल्याचें पूर्वी समजत असत; परंतु यांपैकी कोणा