पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?
४०

एकासहि मूलतत्व म्हणतां येणार नाहीं असे अनेक शोधांतीं ठरलें आहे. जो पदार्थ एकाच जातीच्या द्रव्याचा बनला असेल त्यासच मूलतत्त्व हे नांव देतां येतें. हवा हें वास्तविक दोन अदृश्य वायूंचें मुख्यत्वें मिश्रण असून त्यांत कांहीं घन व वायुरूप अशुद्ध पदार्थ अति सूक्ष्म रूपाने असतात. शुद्ध हवेची घटना खाली लिहिल्याप्रमाणें असतेः-

     १००   भाग हवेंत ऑक्सिजन वायु         २०.९६ भाग.
      "    "    "   नायट्रोजन वायु         ७९    "        
      "     "    "  कर्बानिक अॅसिड वायु    ० ०४  "  
   

 याशिवाय पाण्याची वाफ हवेंत नेहमी थोडीबहुत असते.तसेंच कांहीं सेंद्रिय व दुसरे घनपदार्थ यांचे कणहि हवेंत नेहमी तरंगत असतात. सूर्याचा कौडसा घरांत पडला म्हणजे जे अणुरेणु त्यांत दिसतात तेच हे कण होत. निरनिराळ्या ठिकाणच्या हवेंत या अशुद्ध पदार्थांचें परिमाण भिन्नभिन्न असतें. उदाहरणार्थ, मुंबई, कलकत्ता, वगैरेसारख्या दाट वस्तीच्या शहरच्या हवेपेक्षां फार उंच अशा पर्वता- च्या शिखरावरच्या हवेंत या आगंतुक पदार्थांचे प्रमाण फार कमी असतें. आपल्या जीवनास अत्यंत आवश्यक असा जो ऑक्सिजन ( ज्याला प्राणवायु असें म्हणतात) तो जर हवेंत शुद्ध व नुस्ता असता तर तो आपल्या शरीरांतील व्यापारांस फार तीव्र व प्रखर होऊन माणसाला त्यापासून मरण आले असते. तसे होऊं नये म्हणून सृष्टि- कर्त्यानें त्यांत नायट्रोजन वायु मिसळलेला आहे. या वायूमुळे ऑक्सि- जन पातळ व मंद होऊन आपल्याला हितकर होतो. नायट्रोजन वायूचें शरीरावर विशेष कार्य घडत नाही. कॅर्वानिक अॅसिड वायु हा अपाय- कारक आहे. शुद्ध हवेंत सुद्धां या दुष्ट व विषकारक वायूचे प्रमाण<br >