पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

पक्षुपक्षी वगैरे प्राण्यांचें मलमूत्र, मृतप्राणी वगैरे येतात व ती सर्वांत वाईट असतात. यांपासून आमांश, संग्रहणी, अतिसार, पटकी, टाय- फाईड ज्वर, अन्नमार्गाचे रोग वगैरे अनेक रोग खात्रीने होण्याचा संभव असतो.

 पाण्याची शुद्धता किंवा अशुद्धता वरील द्रव्यांवर अवलंबून अस- ल्यामुळे पाणी शुद्ध राखणे सर्वांशीं जरी नसले तरी बऱ्याच अंशी आपल्या हातीं असतें. आपण ज्या विहिरीचें पाणी पितों, त्या विहि रीच्या आसपास खाळकुवा, तारदखाना, कबरस्थान, मोरी, किंवा कुज- णाऱ्या वनस्पती असल्यास, अथवा विहिरीजवळ स्नान करणे, कपडे धुणे, गुरांढोरांस पाणी पाजणे व त्यांस धुणे वगैरे गोष्टींमुळे हीं विषारी व मलरूप द्रव्यें जमिनीच्या थरांतून विहिरीच्या पाण्यांत उतरतात. विहिर जितकी खोल असेल तिच्या चौपट व्यासाच्या वर्तुळाच्या क्षेत्रां- तील पाणी विहिरींत उतरत असतें. उदाहरणार्थ, विहिरीची खोली २५ फूट असली तर १०० फूट व्यासाच्या वर्तुळाकार क्षेत्रांतील पाणी विहिरींत जाईल; ह्मणजे एवढ्या क्षेत्रांत जी अशुद्धता असेल, ती हळुहळु विहिरींत उतरून तिच्या पाण्यास बिघडवील. म्हणून विहिरीच्या आसपासच्या क्षेत्रांत कोणत्याहि प्रकारची घाण पडूं नये, याविषयीं फार जपले पाहिजे. विहिरीच्या आंतील चारी बाजू चुन्या- दगडांनी किंवा चुन्याविटांनी पक्या बांधाव्या. ह्मणजे चोहों बाजूंनीं बाहेरच्या जमिनीतील घाणपाणी विहिरींत झिरपणार नाही. विहि- रीच्या तोंडावर सभोंवार दोन फूट उंचीपर्यंत दगडचुन्याचा कठडा बांधावा व त्याच्या माथ्यावर केरकचरा वगैरे घाण जाऊं नये म्हणून छपर असून त्यांत उघडझांप करण्याजोगें दार ठेवावें हें दार जरूर पडेल तेव्हां मात्र उघडावें. बाकी इतर वेळीं लाऊन ठेवावें. विहिरी-