पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
मी निरोगी कसा राहीन

होऊन त्यास वाहिन्यांतून वाहतां आलें नसतें. एकंदरींत पाणी हें रक्ताच्या द्वारे सर्व शरीरास अन्न पोंचवून त्याची साफसुफी ठेवणारा एक जासुदच आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. मात्र तें पाणी स्वच्छ व निर्मळ असले पाहिजे. नाहींतर प्रकृतीस अपाय होतो.

 शहरांत रहाणाऱ्या लोकांस मिळणारे पाणी होतां होई तो बरेंच शुद्ध राखण्याची व्यवस्था ठेविलेली असते. परंतु जेथें अशी सोय नसते अशा जागीं खेड्यापाड्यांत रहाणारे लोक विहिरी, तळीं, नद्या, ओढे, झरे वगैरेचें पाणी वापरतात. सृष्टींत मिळणाऱ्या सर्व पाण्यांत कित्येक पदार्थ नेहमीं विद्रुत झालेले व कित्येक पसरलेले असतात. यांपैकी कित्येक हितकारक व अगदीं निरुपद्रवी असतात. अशा पाण्यास आपण शुद्ध व हितकारक असें ह्मणतों. जेव्हां हेच पदार्थ फार मोठ्या प्रमाणानें असतात किंवा दुसरे अपायकारक पदार्थ अस तात, तेव्हां तें पाणी अशुद्ध व भयंकर होतें. पाणी दोन प्रकारच्या द्रव्यांनीं अशुद्ध होतें. एक सेंद्रिय व दुसरें निरिंद्रिय. सेंद्रियमध्यें प्राणीज व उद्भिज द्रव्यें येतात, व निरिंद्रियमध्ये क्षार, खडू वगैरे द्रव्ये येतात. निरिंद्रिय द्रव्यें सेंद्रिय द्रव्यांइतकी शरीराला विघातक नसतात. गळून पडलेली पानें, फुलें, डहाळ्या वगैरे उद्भिज्ज द्रव्यें होत. यांपासून कित्येकदां अतिसार वगैरे रोग होण्याचा संभव असतो.

पण तीं प्राणीज द्रव्यांइतकी विघातक नसतात. प्राणीज द्रव्यांत* माणसें


 * नाप्सु मूत्रं पुरीषं वा टीवनं वा समुत्सृजेत् ॥

 अमेध्यलिप्तमन्यद्वा लोहितं वा विषाणि वा ॥ १ ॥

-मनु.

 अर्थः - उदकांत मूत्र, पुरीष, थुंकी ( श्लेष्मादि), मूत्रादि अपवित्र पदार्थानं लिप्त वस्त्रादि आणि अन्य अपवित्र ( उच्छिष्टादि ), रक्त, कृत्रिम व अकृत्रिम अशीं विषे ह्रीं टाकूं नयेत.