पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

३५

 वर सांगितलेली खाण्याच्या पदार्थांतील तत्त्वें निरनिराळ्या पदार्थात कमी अधिक प्रमाणानें असतात. कांही पदार्थात यांपैकी कांहीं तत्त्वें नसतातहि. दुधासारख्या पदार्थात वरील सर्व तत्त्वें कमीअधिक प्रमाणानें एकवटलेली सांपडतात. दुधासारखें अन्न लहान मुलांस योग्य आहे; पण मूल जसजसे वाढत जातें तसतसे त्याला अधिक अन्न लागतें, व दुधांतील तत्त्वें त्याला पुरेनाशी होतात. ह्मणून दुधा- बरोबर त्यांना इतर पदार्थहि पुढें द्यावे लागतात. औजस अन्नानें शरी- रांतील घटकावयव बनतात, शक्ति, उष्णता, व चर्बी उत्पन्न होते आणि झीज भरून काढण्यास त्याचा फार उपयोग होतो. या कामी निरौजस अन्नांतीलहि कांहीं भागांची जरूरी लागते. निरौजस अन्न हें आंगांत शक्ति किंवा जोर उत्पन्न करणारे किंवा उष्णता व चर्बी उत्पन्न कर णारें असतें. आपल्या या उष्ण हवेच्या देशांत उष्णता किंवा चरबी उत्पन्न करणाऱ्या अन्नाची फारशी जरूरी नसल्यामुळे अशा हवेंत आपणास शक्ति किंवा जोर देणारें (कार्बोहैड्रेट) अन्नच हवें आहे. तथापि उष्णता किंवा चरबी उत्पन्न करणारें अन्न मुळींच नको, असें मात्र कोणीं समजूं नये.

 आतां दुसरा प्रकार जो निरिंद्रिय अन्न ह्मणून सांगितला, त्यांपैकी पाणी तर आपल्याला किती आवश्यक आहे, हें निराळे सांगणे नकोच. आपल्या शरीरांतील प्रत्येक अवयवांत पाणी हा महत्त्वाचा भाग किंवा घटक आहे. ह्मणजे शरीराचें जवळजवळ दोन तृतियांश वजन पाण्या- चेंच आहे असे म्हणण्यास हरकत नाही. आपण जें पाणी पितों तें रक्तांत गेल्यावर रक्तप्रवाहीरूपांत राहून बारीकसारीक केशाकार चाहिन्यांत जातें व त्यामुळे शरीरांतील प्रत्येक अवयवास पोषक अन्नाचा पुरवठा होतो. जर त्यांत पुरेसे पाणी नसतें तर रक्त दाट