पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
मी निरोगी कसा राहीन ?

करावें. कित्येक स्नान केल्यावर ओल्यानेंच पुसण्यासाठीं इकडेतिकडे वस्त्र शोधीत असतात; हें कांहीं बरें नाहीं. यापासून वरीलप्रमाणेच ताप येण्याचा संभव असतो. कित्येक आंगावरील ओल्या वस्त्रानेंच आंग पुसतात; पण तेंहि बरें नाहीं. पुसण्यासाठीं जें वस्त्र घ्यावयाचें तें सुकें व स्वच्छ असून जाडेभरडे असावें. अशा प्रकारचे टॉवेल व पंचेहि येतात. यामुळे आंग लगेच कोरडें होतें, व आंगावरील असलेलानसलेला मल निघून जाऊन रोमरंधें मोकळी होतात, रुधिराभिसरण वाढतें, त्वचा सतेज होते व हुषारी वाटते. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे नेसावींत. कित्येक मुकटा नेसतात, पण त्याला बरेच दिवस पाणी लागलेले नसतें. अशीं वस्त्रे, रेशमी का असेनात, मलीन असतां मुळींच वापरू नये. स्नानानंतर लगेच जेऊं नये असें वर सांगितलेंच आहे. कारण, स्नानानें रक्ताचा प्रवाह त्वचेमध्यें ( पृष्ठ - भागीं) जोराने चालत असल्याने पाचकरस तयार करणाऱ्या (अंत- र्भागीं असणाऱ्या ) पिंडांना पुरेसें रक्त मिळत नाही. अर्थात्, पाचकरस चांगला तयार होत नाहीं व अशा वेळीं खाल्लेले अन्न न पचतां अप- चन मात्र होतें. यासाठी थोडा वेळ राहून मग जेवावें. जेवल्यानंतर लगेच आंघोळ* केल्यानेंहि असेंच अपचन होतें. तसेंच फार मेहनत करून थकवा आलेला असतां लगेच आंघोळ करणें बरें नाहीं. थोडा वेळ विश्रांति घेऊन मग करावी. एकंदरींत स्नान करणें हें आरोग्याला

अत्यंत हितावह असून प्रत्येकानें तें रोज नियमानें करावें. आर्य-


  • न स्नानमाचरेत्

- मनु.

अर्थः -भोजनानंतर स्नान करूं नये.