पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

३३

वैद्यकांत स्नानाचे गुण थोडक्यांत उत्तम रीतीने दिले आहेत, ते असे :-

 दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमूर्जाबलप्रदम् |

 कंडूमलश्रमस्वेदतंद्रातृड्दाह पाप्मजित् ||

 अर्थः-स्नानापासून मल, कंडू, श्रम, स्त्रेद, तंद्रा, तृपा, दाह व ताप यांचा नाश होऊन अग्नि प्रदीप्त होतो; आयुष्य, बल, तेज व पुरुषत्व यांची वृद्धि होते.

८. अन्न.

 स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे नेसावीत. नंतर गंध लावावें व ईश्वरस्मरण करून मग जेवावें प्रकृति निरोगी रहाण्यासाठी अन्नांत सर्व प्रकारचीं घटकद्रव्ये असावीत. आपल्या शरीरामध्ये निरनिराळ्या अवयवांचे भाग, शरीरांत चालत असलेल्या घडामोडींनीं, कणाकणानें कां होईना, क्षणोक्षणीं झिजून नाश पावत असतात; जे ज्याप्रमाणे चालण्यानें जोडा झिजतो, लिहिण्यानें पेन्सील झिजते, त्याचप्रमाणे हात उचलणें, पाय लांब करणे, बसणे, उठणें, चालणें, फिरणें, डोळे मिटणेंउघडणें, वगैरे प्रत्येक क्रियांनीं शरीराच्या निरनिराळ्या भागांची झीज होत असते. ही झीज भरून काढायाला त्या भागांनां रक्ताची जरूरी असते. रक्त हें अन्नापासून तयार होतें. ह्मणून अन्न जर आपण खाल्ले नाहीं, तर झीज वाढत जाऊन देह क्षीण होतो व देह क्षीण झाला ह्मणजे मृत्यु हा ठरलेला. अन्नमय प्राण ह्मणतात त्याचा हेतु हाच. अशा रीतीनें निरनिराळ्या क्रियांनीं शरीराच्या निरनिराळ्या भागांची जी झीज होत असते ती रक्तांतील निरनिराळ्या द्रव्यांनीं भरून येत असल्यानें हीं सर्व घटकद्रव्यें ज्या अन्नांत मिळतील असें