चढतो, उपयोगांत न येणारी वस्तु जशी मलानें लिप्त होते, त्याच-
प्रमाणे व्यायामाव्यतिरिक्त शरीर मलमय होतें. मग टेबलांत फार
दिवस पडून राहिलेल्या पुस्तकांस जशी कसर लागून त्यांचा धुळभुसा
होऊन जातो, तद्वत् अशा शरीरास रोगरूपी कसर लागून शरीर कुच-
कामी होऊन जातें. यासाठी व्यायामाची कधींहि हेळसांड करूं नये.
आंगास तैलादि स्नेह पदार्थ चोळून जिरविणें याला अभ्यंग असें
ह्मणतात. अभ्यंगाची चाल आपल्या इकडे फार पुरातन कालापासून
असल्याचे दिसून येतें. दिवसेंदिवस लोकांनां अंगाला तेल लावणे
किळसवाणे वाटू लागल्यामुळे ही चाल अलीकडे बरीच मोडत चालली
आहे. व्यायामानंतर अभ्यंग केल्याने श्रमपरिहार होऊन सुख वाटतें.
अभ्यंग नेहमीं करावें; त्यापासून शरीराची कांति वाढते, त्वचा सुकुमार
होते, दृष्टि शाबूत रहाते, झोंप चांगली लागते, शरीर सुदृढ होतें,
बात झडतो, रुधिराभिसरण जोरानें चालतें व रक्तांतील विषारी वायु
व मल निघून जातात, आणि ह्मातारपण लवकर येत नाही. आर्यवैद्यकांत
अभ्यंगाचें महात्म्य फार वर्णन केलेले आहे. अभ्यंग हे सर्व शरीरास
पाहिजे आहे, पण त्यांतहि डोकें, कान व पाय यांस मुख्यत्वेंकरून
करावें असें त्यांत स्पष्ट झटले आहे-शिरः श्रवण पादेशु तं विशेषेण
शीलयेत् । अभ्यंगाकरितां निरनिराळीं तैलें सांगितलेली आहेत; पण
सर्वांस सहज मिळण्यासारखें व उत्तम असे ह्मणजे खोबऱ्याचें तेल
होय. अलीकडे बाजारांत खोबऱ्याचें ह्मणून जें तेल मिळतें त्यांत दुका-
नदार व्हाइट आईल (पेट्रोलपासून तयार केलेले ) नांवाच्या तेलाची
भेसळ करूं लागले आहेत. कारण, व्हाइट ऑईल स्वस्त असून त्याला
वास वगैरे मुळींच नसतो; त्यामुळे मिसळण्यास बरें पडतें. अलीकडे