पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
मी निरोगी कसा राहीन ?

असावें. अतीशय गार व झोंबणारा वारा सुटला आहे, अशा जागीं व्यायाम करूं नये.

व्यायामाचे प्रकार.

 व्यायायाचे निरनिराळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ; गाडींत बसून फिरणें, पायांनीं फिरणें, धांवणें, घोड्यावर बसणें, क्रिकेट खेळगें, पोलो खेळणें, वल्हविणें, दंड काढणें, बैठका मारणें, मलखांब करणें, पोहणे, वगैरे.

 गाडींत बसून फिरणें, हा फारच कमी श्रमांचा व्यायाम आहे. यापासून चांगली हवा मिळण्यापलीकडे विशेष मेहनत होत नाहीं. दुखण्यांतून उठलेल्या अशक्त माणसांनीं गाडींत बसून मोकळ्या हवेंत फिरणे चांगले. पायांनीं फिरण्यानें विशेषेकरून पायांच्या स्नायूंस चांगला व्यायाम होतो. बरोबर मित्रमंडळी असल्याने हा व्यायाम विशेष सुखकर होतो. फिरण्यापेक्षां धांवण्यानें जास्त मेहनत होते. पण ती विशेष श्रमाची असल्याने फार वेळ होत नाहीं. एक पासून चारसहा मैलपर्यंत प्रत्येकानें दररोज वय व शक्तीच्या मानानें फिरून येणें आवश्यक आहे. तरुण माणसांनी रोज सहापासून आठदहा मैल- पर्यंत फिरून येणे चांगले. बायसिकलनेंहि पायांना व्यायाम होऊन थोड्या वेळांत दूरचा प्रवास करून येतां येतें. घोड्यावर बसून फिरणें हाहि व्यायाम चांगला आहे. केवळ पायांनी फिरण्यापेक्षां हा व्यायाम जास्त श्रमाचा व थोडा जोखमीचाहि आहे. साध्य असेल त्यांनीं घोड्यावर बसून पांचपासून आठदहा मैल फिरून येणे चांगलें. होडींत बसून नदीखाडींतून वल्हवीत गेल्यानें विशेषतः हातांना आणि छातीपोटाला व्यायाम होऊन शुद्ध हवाहि मिळते. दंड काढणे, जोडी फिरविणें, मलखांब, पॅरलबार, हॉरिझेंटल बार, बैठका, नमस्कार