पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

२५

रक्त जाणें कमी होतें; अर्थात्, त्याचेहि व्यापार मंदावतात. अशा रीतीनें एकामागून एक अवयव बिघडत जाऊन शेवटी सर्व शरीर क्षीण होतें.

 व्यायाम करणें तो शक्तीच्या बाहेर होता कामा नये; कारण, त्यापासून शरीराचा नाश होतो, असे वर सांगितलेंच आहे. आतां तो किती प्रमाणाने करावा असा सहज प्रश्न उत्पन्न होतो. व्यायाम किती करावा, यासंबंधानें सर्वांना एकच नियम घालून देतां येत नाहीं. कारण, व्यक्तीची ताकद, अन्न, वय, देश व ऋतुकाल यांवर व्यायामाचा कमी जास्तपणा अवलंबून रहातो. आर्यवैद्यकांत यासंबंधाने खुलासा केला आहे, तो असा:

 वलस्यान कर्तव्यो व्यायामो हन्त्यतोऽन्यथा |

-मुश्रुत.


 अर्थः - व्यायाम हा नेहमी अर्धवला* करावा. (अर्धवलाने याचा अर्थ असा, कीं, ५० जोर काढण्याची शक्ति असली तर त्याने २५ च जोर काढावेत.) नाहींपेक्षां तो उलट नाश करितो. व्यायाम करणे तो जेवणापूर्वी किंवा अन्न जिरल्यावर करावा. व्यायाम करितांना

लंगोटशिवाय इतर वस्त्रे नसावींत होतां होईतों बाकी सर्वांग उघडें



 * अर्धवलाचं माप आर्यवैद्यकांत सांगितले आहे तें असेंः-

 हृदयस्थो यदा वायुर्वक्त्रं शीघ्रं प्रपद्यते ॥

 मुखं च शोषं लभते तद्वलार्धस्य लक्षणम् ॥ १ ॥

— योगरत्नाकर.


 अर्थ:- जेव्हां हृदयस्थ वायु ( नेहमीप्रमाणे नाकावाटे न जातां ) झपझप मुखावाटे जाऊं पहातो व तोंडाला कोरड पडू लागते, तेव्हां आपले अर्धे बल खर्ची पडले असे समजावें.

 मी नि. ३