पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
मी निरोगी कसा राहीन ?

राखणें बरें. हजामत करणारांनीं ती फार वाढूं देऊं नये. आर्यवैद्यकांत पञ्चरात्रान्नखश्मश्रुकेशरोमाणि कर्तयेत् ।' पांचपांच दिवसांनी हजामत करावी असें झटलें आहे. हजामत करवून घेणारांनां केश राखणारां- इतकी काळजी घ्यावी लागत नाहीं. कारण, केश त्वचेपासून तासून काढल्यानें सर्वच साफ होऊन जातें आणि त्यामुळे मळहि सांचून रहा- •ण्याला जागा रहात नाहीं. केश नेहमीं तासूनच काढावेत. उपटून काढणें कधींहि बरें नाहीं. येथें एक गोष्ट सांगणें जरूर आहे व पुष्कळांनां तिचा अनुभवहि असेल ती ही, कीं, न्हावी लोक आपलीं वस्तरा, नखें काढ- ण्याची शस्त्रे साफ ठेवण्यासंबंधानें निष्काळजी असल्याने किंवा त्यांनां त्याबद्दलचें मुळींच ज्ञान नसल्याने शेंकडों लोकांच्या दाढीवर आणि डोक्यावर वापरण्यांत येणाऱ्या वस्तऱ्यापासून गजकर्ण, नायटे व इतर दुसरे रोग होण्याचा बराच संभव असतो. कित्येक न्हावी तर वस्तऱ्यानें गळवे आणि गरमीचे बद फोडतात. यापासून निरोगी माणसाला बाधा होण्याचा संभव असतो. अशीं पुष्कळ उदाहरणे आमच्या पहाण्यांतहि आली आहेत. यासाठी न्हावी खात्रीचा असला पाहिजे. त्यानें आपले वस्तरे आणि नखें काढण्याची शस्त्रे स्वच्छ राखली पाहिजेत. अशीं शस्त्रें साफ करणें झाल्यास सर्वांत सोपा उपाय ह्मणजे तीं उकळत्या पाण्यांत घालून कांहीं वेळ ठेवणें, हा होय. अगर अॅसिड कॅलिक १ थेंब व ऊन पाणी ४० थेंब अशीं एकत्र करून त्यानें तीं साफ करावीत व अशा मिश्रणांत कांहीं वेळ बुडवून ठेवावींत ह्मणजे वरील अनर्थ टळेल. असे अनर्थ शहरांचे ठिकाणीं विशेषेकरून पहाण्यांत येतात. नखें फार वाढूं देऊं नयेत; तीं वेळच्यावेळी काढून घ्यावीत. नखें फार वाढू दिल्याने त्यांच्याखाली काळा मळ जमतो. या मलांत निर- निराळे रोगजंतू असतात. त्यामुळे अंग खाजवितांना तो मल त्वचेंत