पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

२१

जाऊन विषार बाधण्याचा संभव असतो व जेवतांना अन्नाबरोबर जाऊन पोटहि बिघडूं शकतें. नखांनीं खाजवूं नये, व नखें दांतांनीं कुरतुडून काढूं नये, असें जें ह्मणतात त्याचें कारण हेंच होय.

 केसांत उवा पडल्या असतील तर केसांस चांगलें चोळून केरोसीन तेल लावावें व नंतर साबू लाऊन गरम पाण्याने धुवावें ह्मणजे उवांचा नाश होऊन केश स्वच्छ होतील.

५. व्यायाम.

 शरीर निरोगी रहाण्याला व्यायामाची अत्यंत आवश्यकता आहे. मग तो मनुष्य लहान असो वा मोठा असो, गरीब असो वा श्रीमंत असो, प्रत्येकानें आपली शक्ति, वय, आहार, ऋतु यांना अनुसरून योग्य प्रमाणानें सर्व शरीराला होईल असा नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. केवळ गांवांत इकडेतिकडे किंवा समुद्रावर फिरून आल्यानें अगर गाडींतून फिरल्यानें सर्व शरीराला व्यायाम होईल, अशी जर कोणाची समजूत असेल तर ती मात्र निव्वळ चुकीची आहे. कारण, अलीकडे पुष्कळ स्त्रिपुरुष व काही विद्यार्थी फिरण्यापलीकडे दुसरा कसला व्यायाम घेत अस- ल्याचें दिसून येत नाहीं. व्यायामाची खरी आवश्यकता जर कोणाला असेल, तर ती वरच्या दर्जाच्या ह्मणजे मध्यम व श्रीमंत लोकांनांच होय. कारण अशा पांढरपेशा लोकांचा चरितार्थ केवळ लेखणीवर किंवा वडिलोपार्जित धनदौलतीवर असल्याने नेहमी बसून राहण्यानें व मानसिक श्रमांनीं, त्यांच्या शरीरांत मांद्य आलेले असतें. तसा प्रकार खालच्या दर्जाच्या लोकांचा नसतो. त्यांनां पोटासाठी शारीरिक कष्ट करावे लागत असल्यानें व्यायाम आपोआपच होतो. मात्र त्यांनीं व्यसनांत न पडतां प्रकृति बिघडवून घेतली नाहीं, ह्मणजे ते निरोगी व सशक्त रहातात.