पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

कधींहि बरें नाहीं. यामुळे दांतांना आणि हिरड्यांना इजा होऊन शिवाय हरएक प्रकारचे जंतू आणि मल तोंडांत जाऊं शकतात.

 दांतांस विकार न होतां ते चांगले सुदृढ रहावेत, यासाठीं अन्न सावकाशपणे चांगले चर्वण करून खाण्याची सवय ठेवावी. जेवणाच्या ठराविक वेळांखेरीज मध्यंतरीं कांहीं खाऊं नये. जेवणापूर्वी किंवा कोणताहि पदार्थ खाण्यापूर्वी व खाल्ल्यावर, तसेंच निजण्यापूर्वी व निजून उठल्यावर तोंड स्वच्छ धुवावें. रोजच्या अन्नांत सर्वच पदार्थ मृदु नसावेत. भाकर, बदाम, पिस्ते, अक्रोड, खारका, उस वगैरेसारखेहि जरा कठीण असे पदार्थ असावेत. यां- पासून दांत व जबड्याचे स्नायु बळकट होऊन दांत स्वच्छ रहातात. चहा, कॉफी वगैरे पेयें कढतकदृत पिऊं नये. तसेंच बर्फासारखीं थंडगार पेयेंहि पिऊं नयेत. कारण त्यांपासून दांतांनां इजा होते. वर सांगितलेल्या चूर्णांनी आणि वृक्षांच्या मृदु काड्यांनी किंवा नरम ब्रशनें दांत नेहमीं स्वच्छ करावेत. या वस्तु न मिळाल्या तर नुस्ता चॉक लावून नरम ब्रशनें स्वच्छ केले तरी हरकत नाहीं.

४. हजामत करणें.

 नवीन पिढींतील कांहीं लोक अलीकडे केश राखूं लागले आहेत; पण हजामत करून घेणारेहि बरेचसे आहेत. आरोग्याकरितां केसांची नेहमीं साफसुफी ठेवणें जरूर असतें. केश राखणारांनीं जर आपले केश वेळच्यावेळीं कापून घेतले नाहींत, व स्वच्छ धुवून साफ ठेविले नाहींत तर त्यांत मळ सांचून घाण मारूं लागते, उवा होतात, डोकें एकसारखें खाजूं लागतें व खवडेखवंदे वगैरे त्वग्रोग उद्भवतात. शिवाय, केश राखणें हजामतीपेक्षां महाग पडतें. केश, नेहमीं साबू लावून व पाण्यानें धुऊन स्वच्छ करावेत. ज्यांनां डोळ्यांचा विकार आहे अशा माणसांनीं केश