पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
मी निरोगी कसा राहीन ?

समजूत असते; पण त्यांनी एवढे लक्ष्यांत ठेवावें, की, ईश्वरदत्त दांतांची योग्यता कृत्रिम दांतांनां येणें कधींहि शक्य नाहीं. असो.

 दांत घांसण्यासाठी आपल्यामध्यें खैर, वड, रुई, अर्जुनसादडा, करंज, बकूल वगैरे झाडांच्या काड्या घेऊन त्या चावून कुंचाप्रमाणें करून त्यांनीं दांत स्वच्छ करण्याची फार पुरातन कालापासून चाल आहे. परंतु अलीकडे तीं झाडें मोठ्या शहरांच्या जागीं सर्वांनां पुरेशीं मिळणें शक्य नसल्याने बाजारांत आयत्या तयार मिळणाऱ्या दंतमंज- नांचा लोक उपयोग करूं लागले आहेत. बाजारांत मिळणारी मंजनें हीं सर्वांच्याच उपयोगी आहेत असे नसतें. कारण, दंतमंजनांत पडणारी औषधें ज्याच्यात्याच्या दांतांच्या स्थितीप्रमाणे घातलेली असावी लागतात. जर हिरड्यांतून रक्त येत असले तर दंतमंजनांत हिराबोळ, तुरटी वगैरे स्तंभक औषधें असली पाहिजेत. जर तोंडाला विशेष घाण मारत असेल, तर कॅर्बालिक अॅसिड, मेंथॉल, ओंव्याचें फूल वगैरे जंतुनाशक व घाण नाहींशीं करणारी औषधें पाहिजेत. तात्पर्य, दांतांच्या स्थितीप्रमाणे मंज- नांत औषधें असावी लागतात. जेथें झाडांच्या काड्या किंवा वर सांगितलेली औषधें मिळणे शक्य नसेल, तेथील लोकांनी व निरोगी दांत असलेल्यांनीं कोळशाची बुकी, सुपारी किंवा बदामांची साले जाळून त्यांची बुकी अगर चॉकची बुकी किंवा साबण यांपैकी जे मिळेल त्याचा उपयोग करावा. दंतधावनासाठीं जी बुकी वापरावयाची ती वस्त्रगाळ केलेली असावी. विशेष जाडीभरडी असूं नये.

 कित्येक दांतांत काड्या घालून त्यांनी किंवा चाकूच्या पात्यानें दांत कोरीत असतात. यामुळे दांतांवरील श्वेतकवच निघून ते बिघडतात. ह्मणून उगाच दांत कोरीत रहाणें बरें नाहीं. मुलांनीं पेन्सिली, पेनाचे दांडे, लेखण्या किंवा दुसऱ्या अशाच तऱ्हेच्या वस्तु तोंडांत घालणें