पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ कॉलेज'चे प्रिं. अरंडेल यांनी एक व्याख्यान दिलें, लागलीच या पंथांत नवीन थिऑसॉफिस्ट ' सामील होऊं लागले; आणि या नव्या लोकांना पंथाचों ' सर्टिफिकिटें ' खुद्द त्या पंथाचे मुख्य म्हटलेले कृष्णमूर्ति यांनींच जातीनें द्यावी, असेंही हळूच सुचविण्यांत आलें. लागलीच त्या दिवशींच सायंकाळचा बेत ठर- विण्यांत आला. कृष्णमूर्तीजवळ प्रो. तेलंग यांनी उभे रहावें, दरएका नव्या सभा- सदानें आपलें सर्टिफिकेट घेऊन समोर येऊन तें प्रो. तेलंगांच्या हातांत द्यावें, त्यांनीं तें कृष्णमूर्तीच्या हातांत द्यावें व त्यानें तें पुनः सभासदाला परत द्यावें, असा दरबारी प्रकार चालला. या प्रसंगी प्रथम मिसेस् बिझांट यांचे भाषण झाले होतें; नंतर ' थिऑसॉफिस्ट' मासिकांत या प्रसंगाचें वर्णन त्यांनीच मोठ्या बहारीचें केलें. " सर्टिफिकिटें देण्याचा विधि सुरू झाला तेव्हां एकदम सबंध वातावरण बदलून गेलें, दिवाणखान्यांतील वातावरणांत विलक्षण आंदोलने-'व्हायव्रेशन्स - सुरू झालीं; कृष्णमूर्तीच्या नाजूक व सुंदर बालचेहेऱ्यावर विलक्षण अधिकाराचें तेज आले आणि त्याचा परिणाम सर्टिफिकिटें घेण्याकरितां येणाऱ्या आबालवृद्ध हिंदी, यूरोपिअम व अमेरिकन स्त्री-पुरुष सभासदांवर होऊन, आदरानें कंपायमान होणाऱ्या आपल्या हातांनी त्यांनी तो सर्टिफिकिटें ग्रहण केलीं. सर्टिफिकिटें ग्रहण करितांना कृष्णमूर्तीचा आशीर्वाद घेण्याकरितां प्रत्येकानें आपले शिर त्यांचे पायाशीं मोठ्या आदरानें नमविलें. कृष्णमूर्ति यांनीही शांतपणाचें दर्शक पण उच्च प्रतीचें स्मित करून आपले हात आशीर्वाद देण्यास पुढे केले. या वेळीं अतींद्रिय ज्ञान असलेल्यांना काय दिसले हे सांगण्याचा हा प्रसंग नव्हे; पण एवढें खरें कीं, आपण एखाद्या साध्या ब्राह्मण तरुणापुढे उभें नसून परमेश्वराचें अधिष्ठान ज्यांत आहे अशा विभूतीपुढें आपण आहों, असें सर्वोसच वाटल्याशिवाय राहिलें नाहीं. " वगैरे वर्णन बिझांटबाईनी केलेले आहे. नवीन अवतार होणार आहे व त्यासाठी पूर्वतयारी करून सज्ज असण्याकरितां ही ' ऑर्डर ' निघाली असून अव ताराच्या आगमनासंबंधानें ज्यास विश्वास वाटत असेल अशा कोणत्याही इसमास तीत सामील होतां येतें. पण बनारस येथे कृष्णमूर्तीचें माजविलेले स्तोम, भावी अवताराचें स्थान म्हणून त्याच्यासंबंधानें केलेली प्रसिद्धि, विलक्षण गुणांचा त्याचे- वर करण्यांत आलेला आरोप, रमुळे कित्येक विचारी ' थिऑसॉफिस्टां' ची बिझांटप्रभृति मंडळीसंबंधाची पूज्य बुद्धि डळमळूं लागली. — थिऑसॉफिकल " (