पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुन: अड्यार येथून प्रवासास निघाल्या त्या नारायणय्यांची मुले आपल्याबरोबर घेऊन निघाल्या. त्या व मुलें ता. २१ नोव्हें. १९१० रोजी अड्यार येथे परत आली; मध्यंतरी पुनः मुलांसह एक महिना त्या ब्रह्मदेशांत गेल्या होत्या; आणि मग मार्च महिन्यांत बनारस येथे जाऊन त्या मुलांना घेऊन यूरोपांत चालत्या झाल्या. १९१० च्या डिसेंबर महिन्यांत अड्यार येथें थिऑसॉफिस्टां' ची कन्व्हेन्शन् ' भरली होती. तेव्हां आल्सिऑन ' नें लिहिलेला प्रासादिक ग्रंथ म्हणून एक ' अॅट् धि फीट ऑफ धि मास्टर ' नांवाचें पुस्तक फार प्रसिद्धीस आले. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि मिसेस् बिझांट हे पुस्तक ‘ ईझॉटोरिक स्कूल’ला शिकवूंही लागल्या होत्या. कृष्णमूर्ति हा मैलापूरच्या शाळेत मंदबुद्धीचा म्हणून प्रसिद्ध होता, इंग्रजीचें त्याचें ज्ञान बुटलेराइतपतही नव्हतें, अशा स्थितींत ' मास्टरां'च्या अनुज्ञेनें कृष्णमूर्तीने हे पुस्तक लिहिलें, ही गोष्ट कित्येक श्रद्धाळू भाविकांना देखील पटेना; व त्याबद्दल वर्तमानपत्रांत चर्चा सुरू झाली. कर्नल आल्कॉट यांच्या मानास पात्र झालेले व अड्यार येथील ' थिऑ- सॉफिस्टां'ना नेहेमीं औषधें देणारे डॉ. नाजुंडाराव यांनी या पुस्तकासंबंधानें चर- चरीत टीका केली व हें पुस्तक दुसऱ्या कोणीं लिहून कृष्णमूर्तीच्या नांवावर तें छापले आणि यांत कृष्णमूर्तीचें उगाच माहात्म्य वाढविण्याचा हेतु आहे अशी सडकून टीका सुरू झाली. ( अवतार प्रवर्तन. 33 बिझांटबाई विलायतेहून नारायणय्यांना पत्र्ने लिहून मुलांच्या संबंधानें वर्तमान कळवीत असत. "" तुमच्या मुलांना बसायला येथें मोटार आहे. त्यांना मुद्दाम निरनिराळ्या शिक्षकांकडून ' सँडो'च्या व्यायामपद्धतीचें शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे, ' कृष्णा हा विलक्षण मोठा धर्मगुरु होईल, ' असें मिसेस् सिनेट म्हणतात. असा मजकूर या पत्रांत होता. पुढे हिंदुस्थानांत परत आल्यावर त्या मुलांसह १९११ सालच्या डिसेंबर महिन्यांत बनारस येथील कन्व्हेन्शन'ला गेल्या. दरम्यान कृष्णमूर्तीच्या नेतृत्वाखालीं म्हणून ' धि ऑर्डर ऑफ धि स्टार इन् धि ईस्ट' नांवाची एक शाखा किंवा पंथ अस्तित्वांत असल्याचे जाहीर झाले आणि ' कन्व्हेन्शन' झाली तेव्हां या ' ऑर्डर' संबंधानें, ' सेंट्रल हिंदू ‘