पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ( सोसायटी ' च्या हिंदी शाखेचे चिटणवीस व सेंट्रल हिंदू कॉलेज'च्या “बोर्डे ऑफ टस्ट्रीज ' चे चिटणवीस बाबू भगवान दास • मिसेस बिझांट यांना अत्यंत पूज्य मानून त्यांच्या हाताखाली कित्येक वर्षे थिऑसॉफी'चें काम करीत आलेले- बिझौटबाईला ' मातोश्री ' म्हणून संबोधणारे पण त्यांना देखील हें अव- तार उबविण्याचें कृत्य पचेनासें झालें; व त्यांनी लखलखीत याविरुद्ध लेख लिहि- ण्यास प्रारंभ केला. असो. C खटल्याचें मूळ. 'बनारस येथें मीं बिझांटबाईना सांगितले की, माझी मुले लेडबीटर यांच्या संगतीला रहातां कामा नये,' असें नारायणयांचे म्हणणे आहे. ता. ६ जानेवारी १९१२ रोजी नारायणय्या यांनी बिझांटबाईना एक पत्र लिहिले. त्यांत ते म्हण- तात की, मी स्वतः अड्यार येथें लेडवीटरसाहेबांच्या खोलीत काय पाहिलें हें मीं तुमच्या निदर्शनास यापूर्वी अनेकदां आणिले आहे; त्याचप्रमाणें लेडबीटर यांची कामवासना ही अत्यंत हलक्या प्रकारची असून ती तृप्त करण्याचे त्यांचे मार्ग असामान्य आहेत, हेही मी तुम्हांस स्पष्टपणे सांगितलेलेच आहे. दुसऱ्या एका इसमानें पाहिलेल्या प्रकारासंबंधानें कांहीं गृहस्थांजवळ जो मजकूर सांगितला तोही तुमच्या कानावर गेला असल्याचेंही मला समजलें आहे. आतां माझी मुलें लेडवीटर यांच्यापासून दूर ठेवा अशी विनंती मी तुमचे जवळ अनेकदां केली; पण ती मान्य केली असें म्हणूनही ती पूर्णपणे कृतींत आणीत नाहीं. तेव्हां आतां मी अखेरची विनंती करितों की, त्या माणसापासून माझ्या मुलांना वेगळें ठेवा. दिवसा किंवा रात्रौ माझ्या मुलांवर त्याचें वर्चस्व कोणत्याही प्रकारें होऊं देऊं नका, एवढेच नव्हे तर माझ्या मुलांची व त्याची भेट देखील होऊं देऊं त्यांच्यातील पत्रव्यहारासही मनाई करा. नाहीं तर मी धमकी देण्याच्या उद्देशानें बिलकुल लिहीत नाहीं-पिता या नात्याचे माझें कर्तव्य मी करीन. मि. लेडवीटर याचें कृत्य नैतिक दृष्टया तर दूषणावह आहेच; पण शिवाय तो हिडिस्स स्वरूपाचा गुन्हा असून फौजदारी कायद्यांत त्याबद्दल शिक्षा सांगितलेली आहे. तेव्हां माझ्या नाजुक व सुंदर मुलांसंबंधानें तसला गुन्हा तुम्ही होऊं देणार नाहीं अशी मला खात्री वाटत आहे. माझी विनंती मान्य न झाल्यास नका,