पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेमण्यांत आलें; व तदनुसार ते आपली मुलेबाळे घेऊन ( त्यांची पत्नी १९०५ सालींच निवर्तली होती ) अड्यार येथील 'सोसायटी' च्या आश्रमांत रहावयास आले. कृष्णमूर्ति व नित्यानंद हीं दोन्ही मुले आश्रमाबाहेरील मैलापूर येथील शाळेत जात असत. पण लेडबीटरसाहेबांची दृष्टि एकदां या मुलांवर गेली, आणि त्यांनी एके दिवशीं या मुलांना आपल्याबरोबर पोहायला म्हणून नेलें. नंतर कृष्णमूर्तीला घेऊन येण्यास सांगितले असतां नारायणव्या त्याला घेऊन आला, तेव्हां त्याला आपल्याजवळ कोचावर बसवून व त्याच्या डोक्यावर हात ठेवून लेडबीटरसाहेब भडाभड त्याच्या पूर्वजन्मांची वर्णने सांगू लागले. ‘ कृष्णमूर्ती' ला' आल्सियॉन " हें प्राचीन नांव देण्यांत आले; आणि तो ख्रिस्तापूर्वी २१.४६७ व्या वर्षी जन्मला तो राजा ' लियो' याचा मुलगा होता, त्याची आई म्हणजे ' ओरायन, ' त्याने एका राजाच्या ' हेरिक्लिस' नांवाच्या मुली- बरोबर लग्न लाविलें, त्याला नऊ मुले झालों, वगैरे भूतकथा सांगून मि. लेडबीटर यांनी भोळवट नारायणव्याला गुंगविलें. शनिवारीं-रविवारों कृष्णमूर्ति लेडबीटर- साहेबांकडे नित्य भेटावयास जाऊं लागला व साहेबांचे भूतकथनही चालू राहिलें. पुढे एक दिवस साहेब नारायणयांना म्हणाले:- ' मुलांना त्या मैलापूरच्या शाळेत कशाला पाठवितां ? तेथें कृष्णमूर्तीच्या दिव्य ( आस्ट्रल ) शरीराला इजा होईल. शिक्षणाचेंच म्हणाल तर तुमच्या मुलांना मी शिकवीन' आणि त्या- प्रमाणे व्यवस्था होऊन बिझांटबाईनाही ती मान्य झाली. " कृष्णमूर्ति यांच्या शरिरांत सूर्य-मैत्रेय, ख्रिस्त व ' सूर्य ' एकच अर्से यांचे म्हणणें प्रवेश करणार आहे, " असें खुद्द ' थिऑसॉफिस्ट' मासिकांत प्रसिद्ध झालें. १९१० सालीं कृष्णमूर्तीच्या ' इनीशिएशन' नांवाच्या प्रवेश-समारंभाचा विधि झाला. पण दर- म्यान लेडबीटरसाहेब आपल्या मुलाबरोबर कांहीं दुष्कृत्य करीत असल्याचें दृष्टीस पडल्यामुळे (असें नारायणग्याचे म्हणणे ) नारायणय्या आपली मुलेबाळें घेऊन अड्यार येथून निघून जाऊं लागले. पण मिसेस आनि बिझांट या तेव्हां विलायतेस होत्या. त्यांच्या गैरहजेरींत नारायणय्यांनी अड्यार येथून निघून जाणें बरें नाहीं अर्से सर एस्. सुब्रह्मण्य आय्यर, 'सोसायटी'चे उपाध्यक्ष, यांचे म्हणणे पडलें; आणि त्यांच्या शब्दास मान देऊन नारायणय्या अड्यार येथेंच राहिले. ता. २९ एप्रिल १९१० रोजी मिसेस् बिझांट अड्यार येथे येऊन दाखल झाल्या; आणि