पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ , स्थितींत कर्नल आल्कॉट यानीं राजीनामा मान्य करण्यास आपली अनुमति देऊन तो मान्य केला. कर्नल आल्कॉट हयात असतांनां मिसेस् आनि बिझांट यांनीं लेडबीटर यांच्या कृत्यांचा निषेधच केला होता. ‘वर्यात न आलेल्या मुलांना मि. लेडबीटर यांनीं जो उपदेश केला. तो विवाहसंबंधाच्या मातृपदाच्या व पितृपदाच्या पवित्र ध्येयास गलिच्छ करणारा, मनुष्याची कल्पना दूषित करणारा, मनोवृत्ति बिघडविणारा व शरीरप्रकृतीचा नाश करणारा असून, या उपदेशाचा धिःकार करावा तितका थोडाच होईल, ' असें खुद्द मिसेस् बिझांट यांनी एका पत्रांत लिहिलेले आतां प्रसिद्ध झाले आहे. पण कर्नल आल्कॉट वारल्यावर मि. लेडबीटर यांना पुन: ' सोसायटीं ' त घेण्याचा प्रयत्न झाला व मिसेस बिझांट यांच्याच सहाय्यानें, तोंड लपवीत फिरणाऱ्या लेडबीटरसाहेबांचा पुनः एकदां ‘ सोसायटी ' त प्रवेश झाला; एवढेच नव्हे तर त्यांची अड्यार येथे प्रतिष्ठापना होऊन त्यांचे ग्रंथ व त्यांचे विचार बिझांटबाईना मान्य झाले; आणि सान्या जगास बाजूला सारून लेडबीटरसाहेबांस पाठीशी घालून त्यांचें महात्म्य बिझांट- बाई आतां वर्णन करीत आहेत. लेडबीटरसाहेबांनी बाईला काय मोहनी घातली आहे कोण जाणे, एवढें खरें कीं, त्यांचे पाय नुसता बाईसच कमीपणा येऊन राहिला नसून खुद्द ' सोसायटी ' च्याही अब्रूस कमीपणा आलेला आहे. यांतच खटल्याचें मूळ आहे; पण त्यासंबंधानें लिहिण्यापूर्वी कृष्णमूर्तीसंबंधाने प्रथम माहिती देणें अवस्य आहे. जे. कृष्णमूर्ति. मि. गिड्ढ नारायणय्या नांवाचे एक पेन्शनर गृहस्थ ' सोसायटी ' चे सभासद झाले होते. त्यांना बरीच मुले झालीं. त्यांत जे. कृष्णमूर्ति ( जन्म ता. ४ मे १८९५ ) व नित्यानंद (जन्म - १८९८ ) हीं दोन मुलें होतीं. पेन्शन घेऊन आळसांत काळ घालविण्यापेक्षां राहिलेले आयुष्य कांहीं तरी चांगल्या कामांत काढावे म्हणून यांनीं 'सोसायटी' ची सेवा करावयाचे ठरविलें; आणि त्याप्रमाणें मिसेस आनि बिझांट यांना कळविलें असतां ' सध्या माणसाची जरूरी नाहीं, ' असें यांना उत्तर मिळालें; पण मागाहून ( २३ जाने. १९०९ ) मि. नारायणय्या यांना ' ईझॉटेरिक सेक्शन ' च्या असिस्टंट सेक्रेटरी चे जागेवर