पान:मिसेस आनि बिझांट आणि कृष्णमूर्ति प्रकरण.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ सोसायटीच्या त्या सभासद झाल्या. १८९५ सालीं, 'सोसायटी'चें काम करण्या- करितां हिंदुस्थानांत आल्या, आणि मोठी खटपट करून १९०७ सालीं 'सोसायटी'च्या अध्यक्षाचे जागी त्यांनी आपली निवडणूक करून घेतली. 'सोसा- यटी' चे उत्पादक व अध्यक्ष कर्नल आल्कॉट यांचे वेळेपासून अड्यार हैं ' सोसा- यटी'चें मुख्य ठाणें झालें. जगांतील एकंदर ' थिऑसॉफिस्टांची संख्या सुमारें २४००० असून त्यांतील ५००० हिंदुस्थानांतले आहेत. अड्यार येथें बरीचशी जमीन, कित्येक इमारती व बागा 'सोसायटी ' च्या मालकीच्या आहेत. 'सोसा- यटी ' च्या अध्यक्षाशिवाय सुमारे ५० यूरोपियन व अमेरिकन आणि ४० हिंदी ‘थिऑसॉफिस्ट ' अड्यार येथील आश्रमांत राहतात. सोसायटी त एक • ईझॉटेरिक सेक्शन ' नांवाचें अंतर्मेडळ असून थिऑसॉफी' प्रणित गुह्य ज्ञानाचीं अधिकारी माणसेच तेवढीं या मंडळांत घेतली जातात. या मंडळांतील अधिष्ठात्री देवता किंवा गुरुमाता मिसेस आनि बिझांट याच असून या अंतर्मेडळांत सुमारें ३००० माणसें आहेत. मि. सी. डब्ल्यू लेडबीटर. ( मि. सी.डब्ल्यू.लेडबीटर हे मिसेस् आनि बिझांट यांच्या खांद्याला खांदा लावून ' सोसायटी ' चें काम करणारे एक गृहस्थ असून यांचे वास्तव्य अड्यार येथील सोसायटी 'च्या आश्रमांतच असतें. हे सांप्रत बिझांटबाईचा उजवा हातच आहेत म्हटले तरी चालेल. हे गृहस्थ मूळ'चर्च ऑफ इंग्लंड'मधील पाद्री होते; पण तें काम त्यांनी सोडून दिलें. १८८४ साली मॅडम् व्लॅव्हॅटसकी यांची भेट झाल्यावर त्यांचे- बरोबर हे हिंदुस्थानांत आले होते. बुद्धाचे अनुयायी म्हणून कांहीं वर्षे हे सिलोनमध्ये शिक्षणाचें काम करीत होते. मि. लेडबीटर हे इंग्लंडांत आल्यावर 'सोसायटी' च्या ब्रिटिश शाखेचे ' प्रेसिडेन्शिअल् डेलिगेट' असतांना, तरुण पोरासंबंधींचे कांहीं आरोप त्यांच्यावर उघडपर्णे करण्यांत येऊन इंग्लंडांत थिऑसाफिस्टां च्या एका कमिटीपुढें या घाणेरड्या आरोपाची चौकशी व चर्चा झाली. कमिटीचें काम सुरू होण्यापूर्वीच साहेबांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला; आणि कमि टीतील ६ सभासद राजीनामा मान्य न करितां याला सोसायटींतून हांकून लावा, असें म्हणत होते व सहा सभासद राजीनामा मान्य करावा म्हणत होते, अशा , 6